कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
ताज्या घडामोडी
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद
कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सहा जणांच्या या टोळक्यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.
अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घेत शेतमालाची चोरी करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सहा जणांच्या या टोळक्यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.
चोरांची ही टोळी अचलपूर येथील आहे. चोरीचा शेतमाल नागपूर येथे नेत असताना त्यांना अचलपूर नाका येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून वाहनांसह शेतमाल, असा एकूण ७ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील एक आरोपी पसार झाला आहे.
लायन्या उर्फ दीपक लक्ष्मण शेंद्रे, मोहम्मद निसार इक्बाल मोहम्मद, राजेश सरोज मिश्रा, सतीश पंडितराव भोंडे, शेख खालीद, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. लल्ला उर्फ विजय दीपक वानखडे हा फरार होण्यात यशस्वी झाला. खल्लार पोलिसांच्या हद्दीतील नालवाडा शिवारातील ओमप्रकाश गावंडे यांच्या शेतात पन्नास पोती हरभरा गंजी लावून ठेवण्यात आला होता. हरभरा अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या बाबत खल्लार पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता त्यानुसार हे टोळके पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दिवसा कोणत्या शिवारात शेतमाल साठविला आहे, याची चाचपणी करून नंतर रात्री डाव साधला जात होता. अटक करण्यात आलेल्या या आरोपींनी इतर दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यामध्ये साखरा शिवारातून २२ पोते तूर व नालवाडा शिवारातून ५० पोती हरभरा चोरल्याच्या प्रकारांचा समावेश आहे.
- 1 of 1098
- ››