शेतकऱ्यांशी संवाद साधणे हा गुन्हा कसा ठरू शकतो ः भाकप

शेतकऱ्यांशी संवाद साधणे हा गुन्हा कसा ठरू शकतो ः भाकप
शेतकऱ्यांशी संवाद साधणे हा गुन्हा कसा ठरू शकतो ः भाकप

नाशिक  : शेतकऱ्यांशी संवाद साधणे हा शेतीप्रधान देशात गुन्हा कसा ठरू शकतो ? असा सवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. २०१७ साली शेतकरी संघर्षाच्यावेळी दाखल गुन्ह्यांनंतर भाकप कार्यकर्त्यांना पोलिसांनी नुकत्याच नोटिसा बजावल्याने संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.

कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. मुंबई-नागपूर प्रस्तावित समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीने नागपूर मुंबई भूसंपादन मोजणीचे वेळी ७ एप्रिल २०१७ रोजी पोलिस व शेतकरी यांच्यामध्ये संघर्ष झलक होता. या घटनेनंतर राज्यातील विविध पक्षांचे नेते, शेतकरी नेते तसेच नाशिकचे खासदार यांनी शिवडे गावात जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत संवाद साधला होता. या वेळी सर्वांनी बाधित शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता.

यादरम्यान खा. राजू शेट्टी यांनीही शिवडे येथे भेट दिली होती. या काळात येणाऱ्या नेत्यांची माहिती पोलिसांना दिली जात होती. अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी २ एप्रिल ते १६ एप्रिल २०१७ दरम्यान नाशिक ग्रामीणमध्ये शास्रबंदी व जमावबंदीचे अद्यादेश जाहीर करण्यात आला होता. याठिकाणी राजू शेट्टी व राजू देसले यांनी प्रकल्पास विरोध करण्यासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी विनापरवानगी सभा घेतल्यामुळे १५ एप्रिल २०१७ रोजी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तब्बल दोन वर्षांनंतर सिन्नर पोलिसांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम ४१(१) (अ) प्रमाणे नोटीस बजावली आहे.  

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष खा. राजू शेट्टी, युवक प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, भारतीय कम्युनिस्‍ट पक्षाचे राजू देसले, शिवद्याचे शेतकरी नेते सोमनाथ वाघ, रवींद्र पगार, अनिल काकड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या वेळी नाशिक जिल्ह्याचे खासदार यांनीही भेट दिली होती. त्यांच्यावर कारवाई नाही मात्र इतरांवर झालेली कारवाई आकसापोटी असल्याचा आराेप भाकप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com