agriculture news in marathi Of the Communist Party workers Movement for various demands | Agrowon

कम्युनिष्ट पक्षाचे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

परभणी ः शेतकरी, स्थलांतरित मजुर महाबीज, वखार महामंडाळाची गोदामे, रेल्वे गुड्स शेड, तहसिल कार्यालयाची गोदामे आदी ठिकाणच्या कामगार, भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२२) काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. 

परभणी ः शेतकरी, स्थलांतरित मजुर महाबीज, वखार महामंडाळाची गोदामे, रेल्वे गुड्स शेड, तहसिल कार्यालयाची गोदामे आदी ठिकाणच्या कामगार, भारतीय कम्युनिष्ट पक्षातर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (ता.२२) काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. 

केंद्र शासनाचे ४४ कामगार कायदे बदलण्याचे धोरण रद्द करा. कामाचे तास ८ वरून १२ तास करण्याचे आदेश रद्द करा. २० लाख कोटीचा दावा करणारी फसवी कोविड-१९ मदत योजना रद्द करा आणि कामगार शेतकरी, स्थलांतरित मजूर, छोटे व्यावसायिक, लघु-उद्योजक यांना थेट आर्थिक मदत द्या. शहरी भागात कोरोना तपासणीसाठी कार्यरत अंगणवाडी कर्मचारी, आशा कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दया. लॉकडाऊन काळात पुरवठा साखळीसाठी कार्यरत असलेल्या रेल्वे गुड्स शेड, वखार महामंडळ, तहसील गोदामे येथील हमाल माथाडी कामगारांना १० रुपये प्रति टन प्रोत्साहनपर भत्ता द्या. परभणी मनपा सफाई कामगार सेलू पूर्णा, गंगाखेड येथील कामगारांचे थकीत वेतन अदा करा. 

रोजंदार कामगारांना मागील फरकासह किमान वेतन द्यावे. सर्व कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन प्रोव्हिडंड फंड व अन्य कायदेशीर तरतुदीचा लाभ द्या, परभणी शहरात पूर्व भागात कायम स्वरूपी भाजी मार्केटसाठी जागेची सुविधा उपलब्ध करावी. फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करुन थेट १० हजार रुपयाची आर्थिक मदत द्यावी. महाबीज प्रक्रिया केंद्रातील सर्व कामगारांना लॉकडाऊन काळातील मार्च एप्रिल, मे महिन्यातील वेतन द्या, आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणी कॉ. राजन क्षीरसागर, अॅ़ड. माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल, शेख मुनीर सय्यद अजगर, भगवान कनकुटे, किरण गायकवाड, शेख सलीम आदीसह कामगारांनी विविध ठिकाणी काळ्या फिती लावून निदर्शने केली. 
 


इतर बातम्या
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
‘निसर्ग’चे किनारपट्टीलगत थैमानपुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...
वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पुणे: अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’चक्रीवादळ अलिबागनजीक...पुणे : अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत...