‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन योजना स्थगित

POCRA
POCRA

अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत खासगी जमिनीवरील सामुदायिक शेततळे हा घटक स्थगित करण्यात आला आहे. तर, शेळीपालन या घटकाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे. हे बदल ‘पोकरा’ योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे होते. यापैकी सामुदायिक शेततळ्याला काही जिल्ह्यांत फारसा प्रतिसाद नव्हता, तर शेळीपालन घटकात अनेक जिल्ह्यांमध्ये अनियमितता दिसून आल्याने अधिकाऱ्यांनीच याबाबत आक्षेप घेणाऱ्या तक्रारी केलेल्या आहेत.  बविण्यास २०१८ मध्ये शासनाने मान्यता दिलेली असून जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांत अंमलबजावणी केली जात आहे. सहा वर्षांसाठीचा हा प्रकल्प २०२३-२०२४ पर्यंत राबविला जाईल. आता प्रकल्प सुरू होऊन दीड वर्ष लोटले आहे. या काळात काही योजनांबाबत तक्रारींचे सूर उमटले. प्रामुख्याने निराधारांना वैयक्तीक लाभाचा शेळीपालन हा घटक देण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. याद्वारे त्यांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे, रोजगार मिळावा हा हेतू होता.  गुरुवारी (ता. २७) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रमुखांनी काढलेल्या पत्रात खासगी जागेवरील सामुदायिक शेततळे योजना २६ फेब्रुवारीपासून स्थगित करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तर शेळीपालन घटकाबाबत स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना दिल्या जाणार असून, तोपर्यंत या घटकाची अंमलबजावणी स्थगित ठेवण्याचे सुचविण्यात करण्यात आले आहे. यापूर्वी प्रकल्पाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांपैकी पाइप, पंपसंच, यांत्रिकीकरण, नवीन विहीर यासाठी आर्थिक लक्षांक ठरवून देण्यात आला आहे.   खारपाण पट्ट्यातील शेततळे, फळबाग व वृक्षलागवड, शेडनेट हाउस, पॉलीहाउस, परसबागेतील कुक्कुटपालन, रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, गांडूळखत युनिट, नाडेप, कंपोस्ट उत्पादन युनिट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट, वैयक्तिक शेततळे, भूजल पुनर्भरण, ठिबक व तुषार संच तसेच हवामान अनुकूल वाणांचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचे बीजोत्पादन करणे या घटकांसाठीही आर्थिक लक्षांक किमान ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यांना, तालुक्यांना दिलेल्या लक्षांकापेक्षा अधिक अर्ज आले तर  प्राप्त अर्ज मंजुरीबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.   अधिकाऱ्यांकडूनही तक्रारी ‘पोकरा’ योजनेत मध्यस्थ व काही ठिकाणी यंत्रणेतील घटकांनी हातमिळवणी करून गैरव्यवहार केले. पाहणीत वाटप झालेल्या शेळ्या बोटावर मोजण्याइतक्या लाभार्थ्यांकडे दिसून आल्या. त्यामुळे हे शेळीपालन तातडीने थांबवावे, असे पत्रच काही अधिकाऱ्यांनी ‘पोकरा’ प्रकल्प संचालक कार्यालयाकडे पाठविले. अकोल्यात याच महिन्यांत दौऱ्यावर कृषिमंत्री दादा भुसे आले असताना त्यांनी ‘पोकरा’चा आढावा घेतला. त्या वेळीही अधिकाऱ्यांनी सूचनांवर सूचना केल्या. शेवटी मंत्र्यांना, ‘यामध्ये सुधारणा केल्या जातील,’ असे सांगावे लागले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com