agriculture news in marathi, Companies agree to ban BT's brand marketing | Agrowon

‘बीटी’च्या ब्रॅंड मार्केटिंग बंदीला कंपन्या राजी
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

पुणे : जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने (जीईसी) मंजुरी दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर 'ब्रॅंडनेम' न टाकण्यास कंपन्या अखेर बिनशर्त तयार झाल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार नवे परवाने घेण्यास कृषी आयुक्तालयानेदेखील मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पुणे : जनुकीय तंत्रज्ञान मान्यता समितीने (जीईसी) मंजुरी दिलेल्या बीटी बियाण्यांच्या मूळ नावासमोर 'ब्रॅंडनेम' न टाकण्यास कंपन्या अखेर बिनशर्त तयार झाल्या आहेत. त्यामुळे कायद्यानुसार नवे परवाने घेण्यास कृषी आयुक्तालयानेदेखील मुदत वाढवून दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जीईसीने बीटी कपाशी बियाण्यांच्या मान्यताप्राप्त मूळ नावात राज्यातील कंपन्या बदल करून आकर्षक “ब्रॅंडनेम”ने बीटी बियाणे विकत होत्या. याच ब्रॅंडनेमला मान्यता देणारे करारदेखील या मार्केटिंग कंपन्यांनी मूळ बियाणे उत्पादक कंपन्यांसमवेत केले होते. या करारांना कृषी आयुक्तालयाने मान्यतादेखील दिली होती. तथापि, ही पद्धत चुकीची असल्याची भूमिका कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार व कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी घेतली. त्यामुळे ब्रॅंड मार्केटिंगवरील बंदी आणली गेली.

"ब्रॅंडनेममुळे शेतकऱ्यांमध्ये होत असलेला गोंधळ मिटवण्यासाठी आम्ही ७४ कंपन्यांचे 'ब्रॅंड मार्केटिंग परवाने' रद्द केले आहेत. ब्रॅंड मार्केटिंगवर लावलेल्या बंदीचे पालन करण्याबाबत चर्चा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाच्या गुण नियंत्रण संचालकांनी कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोणत्याही कंपनीने बंदीला विरोध केला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गुण नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुभाष काटकर, मुख्य बियाणे निरीक्षक चंद्रकांत गोरड, सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचे डॉ. शालिग्राम वानखेडे, डॉ. एफ. बी. पाटील, तसेच इतर कंपनी प्रतिनिधींनी या वेळी चर्चेत भाग घेतला.

' बॅंड मार्केटिंगवर बंदी घातल्यानंतर मूळ परवाने जमा करण्यासदेखील कंपन्यांकडून सुरवात झाली आहे. जीईसीने मान्यता दिलेल्या नावाप्रमाणे सुधारित परवाने देण्याची विनंती कंपन्याकडून येत आहे. नवे परवाने घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी आम्ही १० जानेवारीपर्यंत मुदत दिलेली होती. मात्र, कंपन्यांकडून मुदतवाढीची सूचना आल्यामुळे आता ही मुदत २० जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

विपणन कराराला यापुढे मान्यता नाही
बीटी कपाशीच्या बियाण्यांचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आणि बीटी बियाण्यांचे उत्पादन करणाऱ्या मूळ उत्पादक कंपन्या यांच्यात होणाऱ्या व्यावसायिक कराराच्या मान्यतेबाबत कृषी खात्याने आता सावध भूमिका घेतली आहे. ‘ब्रॅंडनेम’ला मान्यता देणारे करार यापूर्वी आयुक्तालयात मान्यतेसाठी आणले जात होते. मात्र, यापुढे आयुक्तालयाच्या स्तरावरून कोणत्याही विपणन कराराला मान्यता देण्यात येणार नाही, अशी भूमिका खात्याने घेतली आहे. "उत्पादक व विपणन कंपन्यांनी ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत शिल्लक असलेल्या बियाण्यांच्या साठ्याची माहिती कृषी आयुक्तालयास सादर केलेली असल्यास या विपणन कराराअंतर्गत बियाणे उत्पादन व बियाणे विक्री करू नये, असे स्पष्ट आदेश कृषी खात्याने दिले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...