Agriculture news in marathi, Companies in Solapur are slow on the issue of crop insurance | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात पीकविम्याबाबत कंपन्या सुस्तच

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

तीन हेक्‍टरवर सोयाबीन आहे. पण गेल्या आठवड्यातील पावसाने ते पूर्णपणे पाण्यात गेले आहे. सोयाबीनचा विमा उतरवला आहे. पण झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. विम्याची भरपाई कधी आणि कशी मिळणार?
- वासुदेव रेळेकर, शेतकरी, शेळगाव (आर), ता. बार्शी

सोलापूर : परतीच्या पावसाने जिल्ह्याला यंदा चांगलाच दणका दिला. पण खरीप हंगामातील पीकविम्याबाबत अद्याप प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या स्तरावर काहीच हालचाली नाहीत. नुकसानीच्या पंचनाम्याबाबतच अद्याप काही स्पष्ट झालेले नाही. तिथे विम्याच्या भरपाईचे काय? अशी स्थिती आहे. 

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील खरीप आणि रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाकडून प्राथमिक स्तरावर नुकसानीची माहिती नजरअंदाजाने गोळा करण्याचे काम सुरू आहे. पण खरिपातील विम्यासाठी प्रशासन, बॅंका वा विमा कंपन्यांकडून अद्यापही काहीच हालचाल नाही. जिल्ह्याचा मुख्य हंगाम रब्बी असल्याने खरिपातील पेरणी आणि विम्याचा टक्काही अगदीच कमी असतो.

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाकडेही याबाबत माहिती नाही, काही तालुक्‍यात नुकसानीची माहिती भरून घेण्यासाठी काही कंपन्यांकडून फॉर्म दिले जात असल्याचे सांगितले गेले. पण त्याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे नाही. केवळ नुकसानीची माहिती येऊ द्या, त्यानंतर विम्याबाबतही कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले. 

विम्याच्या भरपाईबाबत निराशा

गेल्या दोन वर्षात मात्र सततच्या दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकरी जागृत झाले आहेत, विमा भरत आहेत. पण परताव्यासाठी त्यांची ससेहोलपट होत आहे. गेल्या वर्षी याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांना विमा भरूनही भरपाई मिळालेली नाही. गतवर्षी सुमारे ५३ कोटीपेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांना विम्यापोटी मंजूर झाली होती. पण गेल्या वर्षीच्या विम्याची रक्कम अजून काही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अनेक गावात विमा हप्ता भरूनही केवळ ५ ते १० टक्के शेतकऱ्यांनाच तो मंजूर झाल्याचे चित्र होते. त्यामुळे विम्याच्या भरपाईबाबत निराशाच आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...