बुलडाणा जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून रब्बीचा तुलनात्मक आढावा

केंद्रीय पथकाने घेतला रब्बीचा तुलनात्मक आढावा
केंद्रीय पथकाने घेतला रब्बीचा तुलनात्मक आढावा

बुलडाणा : केंद्रीय पथकाने सिंदखेडराजा आणि लोणार तालुक्यात भेटी देऊन दुष्काळी स्थितीची वस्तुस्थिती जाणून घेतली. गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांचा तुलनात्मक आढावा त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतला. या पथकामध्ये निती आयोगाचे संयुक्त सल्लागार मनेश चौधरी, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस.सी शर्मा यांचा समावेश होता.

सिंदखेडराजा तालुक्यातील चिंचोली जहाँगीर येथून पथकाचा दुष्काळ पाहणी दौरा सुरु झाला. शेतकरी नारायण बाबूराव नागरे, नारायण घुले यांच्या शेतातील कापूस, तूर पिकांसह विहिरींच्या पाणी पातळीची पाहणी पथकातील सदस्यांनी केली. मागील वर्षीच्या कापसाच्या आणि यंदाच्या कापूस, सोयाबीनच्या उत्पादनाचा तुलनात्मक आढावा त्यांनी घेतला. गेल्या वर्षीची रब्बी हंगामातील पिके आणि यंदाची रब्बीची परिस्थिती याची माहिती त्यांनी घेतली. घुले यांनी काढून टाकलेल्या कापसाबाबतही त्यांनी जाणून घेतले.

पथकाने लोणार तालुक्यातील देवानगर येथील शेतकरी गजानन जाधव, दलसिंग राठोड यांच्या शेतात पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी पाण्याच्या परिस्थितीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन पिकासाठी एकरी येणाऱ्या खर्चाची व मिळालेल्या उत्पन्नाची माहितीही त्यांनी घेतली.

या वेळी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जलसंधारणचे आयुक्त दीपक सिंगला, विभागीय आयुक्त पीयूष सिंग, औरंगाबादचे अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, उपविभागीय अधिकारी काळे, तहसीलदार संतोष कणसे, सुरेश कव्हळे, तालुका कृ‍षी अधिकारी वसंत राठोड, बिपीन राठोड, विनोद वाघ आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com