महसूलच्या पंचनाम्यानुसार नुकसानभरपाई द्या : पालकमंत्री मुंडे

Compensate in Beed according to revenue plan: Guardian Minister Munde
Compensate in Beed according to revenue plan: Guardian Minister Munde

मुंबई : बीड जिल्ह्यातील खरीप २०१९ च्या पात्र विमा धारक शेतकऱ्यांना महसुलच्या पंचनाम्यानुसार पिक विमा नुकसान भरपाई द्या, पिक कापणी प्रयोगानंतर नुकसान भरपाई वाटपास झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी १२ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे द्या, क्लेम नाकारलेल्या शेतकऱ्यांना २१ तारखेपर्यंत कारणांसह माहिती द्या, राज्यस्तरीय समितीवर शेतकरी आणि लोकप्रतिनिधी घ्या, अशी मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली. 

बीड जिल्ह्यातील प्रलंबित पिक विमा नुकसान भरपाईच्या संदर्भात शुक्रवारी (ता. १४) आयोजित बैठकीत निर्णय घेण्यात आले. मुंडे यांच्या विनंतीवरून कृषीमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पिक विमा कंपनी आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक विधानभवनात झाली. आमदार प्रकाश सोळंके, कृषी आयुक्त सुहास दिवसे, पिक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते. 

२१ मार्चपूर्वी क्लेम नाकारलेल्या ३४ शेतकऱ्यांना त्यांचा क्लेम का नाकारला, याची कारणे विमा कंपन्यांनी द्यावीत, असा निर्णय करण्यात आला. सन २०१९ च्या खरीप हंगामातील पिक विमा नुकसान भरपाईबाबत महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्याचा आधार घेवून त्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची सूचना करण्यात आली. त्याला कृषी विभाग आणि कृषी मंत्र्यांनीही दुजोरा दिला.

कृषीमंत्र्यांचे कार्यवाहीचे आश्‍वासन

पिक कापणी प्रयोगानंतर तीन आठवड्यांमध्ये विमा कंपनीने नुकसान भरपाई अदा करण्याची तरतुद आहे. विलंब झाल्यास १२ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना पैसे देण्याची तरतुद आहे. हा धागा पकडून पालकमंत्री मुंडे यांनी भरपाई वाटपातील विलंबाप्रकरणी १२ टक्के व्याजदराने पैसे देण्याची सूचना केली. राज्यस्तरीय पिक विमा समितीवर शेतकऱ्यांचा प्रतिनिधी, लोकप्रतिनिधींचा समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. कृषीमंत्र्यांनी याबाबत धोरणात्मक कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com