Agriculture news in Marathi, Compensate crops affected by heavy rainfall in Parbhani | Agrowon

परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची भरपाई द्या

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली आहे. 

परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे करण्यात आली आहे. 

गेल्या तीन, चार दिवसांमध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत अवेळी, ऐन सुगीमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे हाताशी आलेल्या, काढणी केलेल्या तसेच मळणी सुरू असताना सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. यंदा सोयाबीनचे पीक चांगले आलेले असताना दिवाळी सण आनंदात साजरा करता येईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी पीकविमा संरक्षण घेतेललेले नाही. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे. 

पीक नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खंटीग, मुंजाभाऊ लोडे, केशव आरमळ, रामभाऊ आवरगंड, उस्मान पठाण, धोंडीराम खटींग, राजेभाऊ खुळे, संतोष पोते, दिंगबर पवार, एस. आर. शिंदे, प्रदीप कुलकर्णी, अशोक खुळे, पांडुरंग खुळे, विक्रम मोरे, विष्णू खुळे, भास्कर खुळे, गंगाधर खुळे, पांडुरंग खुळे, आश्रोबा नेमाडे, मारोती रणेर आदींनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 

हवामान विभागाचा केला निषेध 
हवामान विभागाने मोसमी वारे परत गेल्याचे आठ दिवसांपूर्वी जाहीर केले होते. चुकीचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हवामान विभागाचा निषेध करण्यात आला. 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...