दुष्काळग्रस्तांना नुकसानभरपाई द्या : तुपकर

दुष्काळग्रस्तांना नुकसानभरपाई द्या : तुपकर
दुष्काळग्रस्तांना नुकसानभरपाई द्या : तुपकर

बुलडाणा :  दुष्काळग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने लागू करा, जनावरांना दावणीवर चारा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्याकडे केली.

बुलडाणा येथे आयोजित कार्यक्रमासाठी जानकर अाले असताना तुपकर यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता त्यांच्या निदर्शनास अाणून दिली. शासनाने शिक्षणाच्या संदर्भातील संहिता २०१७ तयार केली. त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार नाही, हे लक्षात आणून दिले.

यंदा पाऊस नसल्यामुळे पश्चिम विदर्भातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकरी संटकात आहेत. जनावरांना चाराही नाही, अनेक गावांत पिण्याचे पाणी नाही. सरकारने दुष्काळाची घोषणा केली, मात्र दुष्काळी योजनांची अंमलबजावणी अद्याप सुरू नाही. अजूनही बँका, फायनन्स, मायक्रो फायनन्सकडून सक्तीची वसुली सुरू आहे. मागील वर्षीच्या तूर, हरभरा, उडदाचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. उत्पादित झालेल्या सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी स्वाभिमानीने बुलडाण्यात मोठे आंदोलन केले. प्रशासनाने बुधवार (ता. ९) पर्यंत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास ९ जानेवारीपासून रस्त्यावर उतरण्याचा इशारा स्वाभिमानीने प्रशासनाला दिला. 

या आहेत मागण्या  हेक्टरी ५० हजार रुपये द्या, जनावरांना दावणीवर चारा उपलब्ध करा, नाफेडमध्ये विकलेल्या तूर, हरभरा, उडदाचे व्याजासकट पैसे द्या, बँका, मायक्रो फायनन्सची वसुली तात्काळ थांबवा, वीजबील वसुली थांबवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करा, सरसकट कर्जमुक्ती द्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com