Agriculture news in Marathi Compensate the families of the dead farmers in the agitation: Rahul Gandhi | Page 4 ||| Agrowon

आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई द्या ः राहुल गांधी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आता शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी सरकारला घेरण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी आता शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. सरकारने चूक मान्य केली असल्याने आता ही भरपाई द्यावी अशी मागणी राहुल गांधी यांनी आज केली. सरकार घाबरल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधानांची घोषणा आणि त्यानंतरचे राजकीय आरोप प्रत्यारोप या सर्व काळात परदेश दौऱ्यावर असलेले राहुल गांधी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयक चर्चेविना आवाजी मतदानाने संमत झाल्यानंतर पहिल्यांदा मध्यमांसमोर आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. ते म्हणाले, की कृषी विधेयक रद्द करण्यासाठीच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चूक झाल्याचे मान्य केले होते. आता सरकारने चूक मान्य केली असताना आंदोलनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळायला हवी. शेतकरी आंदोलनामध्ये सातशेहून शेतकऱ्यांचा बळी गेल्यावरून कॉंग्रेसतर्फे सरकारला लक्ष्य केले जात आहे. 

राहुल गांधी म्हणाले,की तीन काळे कृषी कायदे सरकारला मागे घ्यावेच लागतील, असे आपण म्हटले होते. देशातील तीन चार भांडवलदारांपुढे शेतकऱ्यांची ताकद कमी पडू शकत नाही. हे शेतकरी, मजुरांचे यश आहे. मात्र कायदे रद्द करण्यात आले आणि संसदेत त्यावर चर्चा होऊ दिली नाही, ते पाहता सरकार घाबरले आहे हे दिसून येते. आपण चूक केली असल्याचे सरकारला कळले आहे, हे त्यातून कळते. आंदोलनात हुतात्मा झालेल्या लोकांबद्दल, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे बनविण्यामागे कोणती शक्ती होती, याबद्दल चर्चा करायची आहे.


इतर अॅग्रो विशेष
जमीन सुपीकता, पीक फेरपालट हेच सूत्रअनियंत्रित पाणी, खतमात्रा वापरामुळे जमीन सुपीकता...
‘मध क्लस्टर’ निर्मितीसाठी सर्वतोपरी मदत...नाशिक : मधमाशीपालन हे अतिरिक्त रोजगाराचे साधन...
विलंब ‘एफआरपी’चे व्याज  कारखान्यांना...नांदेड : शेतकऱ्यांसोबत बेकायदा करार करून एफआरपीचे...
सोयाबीनसाठी चीनची अमेरिकेवर मदार? पुणे ः ब्राझील आणि अर्जेंटिनात यंदा सोयाबीन...
राज्यात गारठा पुन्हा वाढणार पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...
महावितरण विरोधात कऱ्हाडमध्ये शुक्रवारी...कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांना बोगस, चुकीची...
द्राक्ष दराच्या निर्णयाची अंमलबजावणी...नाशिक : निर्यातक्षम द्राक्ष मालाच्या उत्पादन...
यंदा डाळिंब निर्यातदार  शेतकरी...सांगली ः राज्यातून डाळिंबाची निर्यात वाढण्यासाठी...
फळबाग लागवडीसाठी  आता सुधारित योजना पुणे ः फलोत्पादन वाटचालीत रोहयो फळबाग लागवडीनंतर...
कोविडमुक्त गाव अभियान पुणे विभागातही...पुणे : जिल्हा परिषद आणि भारतीय जैन संघटनेने...
ग्रामसेवकांकडील अतिरिक्त कामांबाबत...अकोला ः राज्यातील ग्रामसेवकांकडे असलेली अतिरिक्त...
दळणासाठी नदीतून जीवघेणा प्रवासतळोदा, जि. नंदुरबार : सातपुड्यातील सावऱ्या दिगर...
वाळूदर येतील आवाक्यात  लिलाव कालावधी...मुंबई : राज्यात वाळूचा मुबलक पुरवठा आणि दरांमध्ये...
नगरमध्ये दीड लाख हेक्टरवर कांदा लागवडनगर ः नगर जिल्ह्यात यंदाही कांदा लागवडीला...
तेलकट डागविरहित डाळिंब अन् बारमाही...तेलकट डाग, सूत्रकृमी किंवा अन्य कारणांमुळे...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...