agriculture news in marathi To compensate Got Rs. 270 | Agrowon

नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपये

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

पाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील अरुण पाटील या शेतकऱ्यासंदर्भात घडला असून, गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यात अवघे २७० रुपये जमा झाले आहेत. हा विषय सध्या तालुक्यात चांगलाच चर्चेत आला आहे. 

पाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील अरुण पाटील या शेतकऱ्यासंदर्भात घडला असून, गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून त्यांच्या खात्यात अवघे २७० रुपये जमा झाले आहेत. हा विषय सध्या तालुक्यात चांगलाच चर्चेत आला आहे. 

अरुण पाटील यांची खडकदेवळा शिवारात शेती आहे. गेल्या वर्षी अतिपावसामुळे हाताशी आलेले पीक व तोंडाशी आलेला घास नष्ट झाला. नेहमीप्रमाणे महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे केले. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा झाली. ही रक्कम अजूनही बहुतांश शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा सूरही कानी पडतो. परंतु अरुण पाटील यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईपोटी अवघे २७० रुपये जमा झाले आहेत.  

अतिपाऊस, नैसर्गिक आपत्ती अथवा पावसाअभावी शेतकऱ्याच्या खरीप व रब्बी पिकांचे नुकसान होण्याचे सातत्य गेल्या काही वर्षांपासून कायम आहे. अशा नुकसानीचे महसूल विभागाच्या वतीने पंचनामे होऊन भरपाईसाठी शासनाकडे अहवाल पाठवणे व शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा करणे, ही प्रक्रिया सातत्याने सुरूच असते. मिळणारी भरपाई झालेल्या नुकसानीच्या किती प्रमाणात असते व त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याला कितपत दिलासा मिळतो, हा कदाचित संशोधनाचा विषय ठरेल. त्यामुळेच शासनाच्या या नुकसान भरपाईच्या विषयावर सातत्याने टीकेचा सूर उमटताना दिसतो.

न्यायाची मागणी 

या प्रकाराबाबत संतप्त भावना व्यक्त होत असून, अरुण पाटील यांनी तहसीलदार कैलास चावडे यांच्याकडे लेखी पत्र देऊन नुकसानभरपाई रकमेसंदर्भात चौकशी होऊन योग्य ती भरपाई व न्यायाची मागणी केली आहे.


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...