Agriculture news in marathi Compensate the orange growers: MLA Bhuiyar | Agrowon

संत्रा उत्पादकांना भरपाई द्या ः आमदार भुयार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

अमरावती ः वरुड, मोर्शी तालुक्‍यात पूर्वमोसमी पावसामुळे संत्रा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले. पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागला. त्याची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

अमरावती ः वरुड, मोर्शी तालुक्‍यात पूर्वमोसमी पावसामुळे संत्रा, गहू व इतर पिकांचे नुकसान झाले. पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भावही वाढीस लागला. त्याची दखल घेत आमदार देवेंद्र भुयार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

पूर्वमोसमी पावसाची संततधार यावर्षी सुरुच आहे. त्याचा सर्वाधिक फटका संत्रा उत्पादकांना बसला आहे. रब्बी हंगामातील पिकांचे सर्व्हेक्षण, पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी आमदार भुयार यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली. 

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड तालुक्‍यात संत्रा हे महत्त्वाचे फळपिक आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकावरच अवलंबून आहे. वरुड, मोर्शी तालुक्‍यात अंदाजे तीन ते साडेतीन लाख टन संत्रा उत्पादन असून या दोन्ही तालुक्‍यांतील ३० टक्‍के म्हणजेच एक लाख टन संत्रा शिल्लक आहे. ३०० कोटी रुपये इतकी या संत्र्याची किंमत असून पावसाचा त्याला फटका बसला. शासन तसेच पीकविमा कंपनीने याची दखल घेत भरपाईसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी यावेळी आमदार भुयार यांनी शासनाकडे केली आहे.


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...