Agriculture news in Marathi Compensate oranges to lakhs per hectare | Page 2 ||| Agrowon

संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई द्या

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा, मोसंबी फळांची गळ झाली. त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना प्रतिहेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाऑरेंजने केली आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा, मोसंबी फळांची गळ झाली. त्यामुळे उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना प्रतिहेक्‍टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणी महाऑरेंजने केली आहे. कृषी सचिव एकनाथ डवले यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनानुसार, विदर्भात संत्रा, मोसंबीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात हे क्षेत्र ७० हजार हेक्‍टर असून नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत उर्वरित ३० हजार हेक्‍टर क्षेत्र आहे. यावर्षी पावसाची संततधार सुरू असल्याने संत्रा आणि मोसंबी फळांची गळ मोठ्या प्रमाणावर झाली. कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात अमरावती, वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यांत संत्रा, मोसंबी पिकांचे सुमारे सात हजार ८१० हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात हे नुकसान त्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. विदर्भातील हे मुख्य पीक असून त्याची उत्पादकता आणि उत्पन्नावरच या भागातील अर्थकारण अवलंबून राहते. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक बागायतदारांच्या बागेत फळच उरली नाही.   त्याची दखल घेत संत्रा मोसंबी उत्पादकांना नैसर्गिक आपत्तीअंतर्गत हेक्टरी एक लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी महाऑरेंजचे कार्यकारी संचालक श्रीधर ठाकरे यांनी केली आहे. कृषी सचिव एकनाथ डवले विदर्भाच्या दौऱ्यावर असताना त्यांना हे निवेदन देण्यात आले. यावेळी महाऑरेंजचे संचालक राहुल ठाकरे, मनोज जवंजाळ उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार?सातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन...
कृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वलअकोला ः जिल्ह्यात कृषी विभागामार्फत राबविलेल्या...
पीक नुकसानीची मदत निश्‍चित मिळेल ः मलिकपरभणी : ‘‘हवामान विभागाने रविवार (ता.२५)...
रयत क्रांती संघटनेतर्फे जागरण गोंधळ...पुणे ः  रयत क्रांती संघटनेतर्फे...
इथेनॉल पूर्णत्वासाठी ‘कादवा’ला सहकार्य...नाशिक : ‘‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा मुसळधार...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक दिवसांची...
नाथाभाऊ काय चीज आहे, दाखवून देऊ : शरद...मुंबई: नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने...
शेतकऱ्यांना मदत करण्याचीच भूमिका : शहालातूर : ‘‘कृषी उत्पन्न बाजार समितीने अडचणीच्या...
धान्य खरेदीसाठी नोंदणीचे निर्देशच नाहीत जळगाव ः जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून शासकीय धान्य...
मदतीच्या घोषणेचे स्वागत, पण तोकडीः डॉ....नगर ः राज्यात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...
जलसंधारणाच्या `बुलडाणा पॅटर्न`चा डंकाअकोला ः महामार्ग तयार करताना त्यासाठी लागणारे...
सोयाबीनचे मूल्यवर्धित पदार्थसोयाबीनपासून सोया-दूध, सोया पनीर, पीठ आणि...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
कापूस उत्पादकांचे शोषण थांबवा: विजय...नागपूर: देशात कापसाचे दर कमी होत असतानाच...
फवारणीनंतर १८ एकरातील कपाशीने टाकल्या...अकोला ः जिल्ह्यातील म्हातोडी येथील शेतकऱ्याने...
खडसेंच्या पक्षांतराने बदलणार राजकीय...जळगाव ः भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे...
मक्याची लॉट एंट्री न झाल्याने ‘शोले...सटाणा, जि. नाशिक: हमीभावाने खरेदी केलेल्या...
परभणी जिल्ह्यात महावितरणची ६३७...परभणी :  जिल्ह्यातील वीजचोरीला आळा...
ला निनामुळे मान्सून प्रभावितलॉकडाऊनची परिस्थिती पाहता, महाराष्ट्रात...
तंत्रज्ञान हरभरा लागवडीचे...जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पीक...