Agriculture news in marathi Compensate, otherwise 'block the way' | Agrowon

नुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

अंबड, जि. जालना : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’ करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

अंबड, जि. जालना : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’ करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.  

जिल्ह्यातील डाळिंब, मोसंबी, द्राक्षे व ऊस पिकांचे सततचा पाऊस, वादळ वारे यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करा. यासह इतर मागण्यासाठी फळबाग तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.९) तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. 

तहसिलदार विद्याचरण कडवकर यांच्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे दिलेले लेखी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळ बागांवर अस्मानी संकट आले आहे. मोसंबी फळांवर अचानक पडलेला कोळी रोग, काळे डाग, तसेच फळांची वाढती गळ, यामुळे दर चांगलेच गडगडले आहेत. द्राक्ष वेली शंभर टक्के करपल्या आहेत. वादळामुळे ऊस जमिनीवर आडवा झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या फळबागा, उसाचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, मंगळवारी (ता.१५) रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर प्रकाश बोरडे, भाऊसाहेब कनके, राजीव डोंगरे, रामजी रायकर, तुकाराम जामदरे, बप्पासाहेब डोखळे, सतीश फोके, बाळासाहेब डोखळे, भरत रत्नपारखे, पांडुरंग घोलप, पांडुरंग गटकळ, अशोक जाधव, नामदेव मांगडे, सुरेश काळे, दीपकसिंह ठाकुर, प्रभाकर डोखळे, भैय्यासाहेब हातोटे, संतोष कनके, कैलास खराबे, अर्जुन गटकळ, एकनाथ खराबे, अंबादास अंभोरेसह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 


इतर बातम्या
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...
‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...
`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...
पेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...
बुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...
शेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...
पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...
अतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...
गोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...
सातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...