‘समृद्धी’ मार्गातील पाइपलाइन नुकसानग्रस्तांना भरपाई द्या

Compensate the pipeline victims in the 'samruddhi' path
Compensate the pipeline victims in the 'samruddhi' path

बुलडाणा : जिल्ह्यात दोन पॅकेजमध्ये समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. समृद्धी महामार्ग कामासाठी लगतच्या परिसरातील गौण खनिजाचे उत्खनन करून उपयोगात आणण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, बहुतेक ठिकाणी परवानगी नसलेल्या ठिकाणांहून गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले आहे. अशा परवानगीशिवाय उत्खनन केलेल्या ठिकाणी संबंधितांवर कारवाई करावी. रस्ता कामात शेतकऱ्यांच्या पाइपलाइनला नुकसान झाल्याचे निदर्शनास आले असल्याचे सांगत खासदार म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई संबंधित कंत्राटदाराने द्यावी, असे आदेश केंद्रीय ग्रामीण विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात जिल्हा विकास समन्वयन व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आढावा घेताना जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा,  प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जालींधर बुधवत, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते.

या वेळी जाधव म्हणाले, ‘‘खडकपूर्णा प्रकल्पामध्ये कालव्यांसाठी शेतकऱ्यांच्या शेतांमधून खोदकाम करण्यात आले आहे. अशा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. कालव्यांसाठी जमीन संपादीत केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मोबदला द्यावा. जिगांव प्रकल्पाच्या संदर्भात धरण, सांडवा या बाबींच्या कामांबरोबरच पुनर्वसन कामाची गती ठेवावी. पुनर्वसन झाल्यानंतरच धरणात पाणी साठविता येणे शक्य होणार आहे. पुनर्वसनाची कामे दर्जेदार करावीत, जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यंत्रणेने १४० गावे पाणीपुरवठा योजनेसाठी टाकलेली पाइपलाइन १२ मिलोमीटरपर्यंत नियमानुसार टाकली नाही. त्यामुळे सदर १२ किलोमीटर रस्ता काम होऊ शकत नाही. तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराकडून पाइपलाइन बदलून टाकावी. जेणेकरून रस्ता काम सुरळीत पूर्ण होऊ शकेल.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com