Agriculture news in marathi, Compensate the pomegranate growers: Sankh. | Agrowon

डाळिंब उत्पादकांना नुकसानभरपाई द्या : संख

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

सोलापूर  : पावसाने राज्यभरातील डाळिंब उत्पादकांचे कोट्‌यावधीचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळात कशाबशा बागा जगवल्या. त्यात आता ओल्या दुष्काळाने त्याही हातच्या गेल्या. डाळिंब उत्पादकांचे कधीच भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन भरीव मदत द्यावीच, पण संपूर्णपणे कर्जमाफीही द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख यांनी प्रशासनाकडे केली. 

सोलापूर  : पावसाने राज्यभरातील डाळिंब उत्पादकांचे कोट्‌यावधीचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळात कशाबशा बागा जगवल्या. त्यात आता ओल्या दुष्काळाने त्याही हातच्या गेल्या. डाळिंब उत्पादकांचे कधीच भरुन न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करुन भरीव मदत द्यावीच, पण संपूर्णपणे कर्जमाफीही द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघाचे अध्यक्ष शिवलिंग संख यांनी प्रशासनाकडे केली. 

संख यांनी यासंबंधीचे निवेदन प्रसिद्धीस दिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, या आधीच कोरड्या दुष्काळात डाळिंब उत्पादक पाण्याअभावी अडचणीत होते. अनेक भागात बागा गेल्या. त्याचे पंचनामे अद्यापही झाले नाहीत. झाले त्यांना भरपाई मिळाली नाही. त्यात आता ओल्या दुष्काळाची भर पडली आहे. निसर्गाच्या अशा दुहेरी संकटात डाळिंब उत्पादक अडकला आहे. 

ऑक्‍टोबर महिन्यात सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील सोलापूर, सांगली, नाशिक, परभणी, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, नगर या जिल्ह्यात सर्वाधिक डाळिंब बागायतदारांचे नुकसान झाले आहे. मृग आणि हस्त असे दोन्ही बहार त्यामुळे अडचणीत आले आहेत. डाळिंबाची फुलगळ, फळकूज यासारखे प्रकार घडले आहेत.

या प्रकारामुळे राज्यातील ७५ टक्के डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. अति पावसाने नुकसान झालेल्या बागांचे पंचनामे तातडीने पूर्ण करुन भरीव मदत द्यावी, तसेच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या उत्पादकांना बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी द्यावी, असेही संख यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. 


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...