पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई नगण्य : अशोक चव्हाण 

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
Compensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan
Compensation from crop insurance companies is negligible: Ashok Chavan

नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. यातील पीकविमा योजनेचे ५५० कोटी रुपये महसूल यंत्रणेच्या कार्यक्षम कारभारामुळे विमा कंपनीकडून आपल्याला घेता आले. तथापि, पीकविमा योजनेतून मिळणारी भरपाई ही नगण्य असून, राज्य शासनाच्या नुकसान भरपाईच्या धर्तीवर हेक्टरी दहा हजार रुपयांपर्यंत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नात असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.  हदगाव-तामसा-भोकर-उमरी रस्त्याच्या रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतुकीस सोमवारी (ता. २२) सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी आमदार अमिता चव्हाण, भोकरचे नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, जिल्हा परिषदेचे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी उपस्थित होते.  राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न अधिक बिकट आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशावेळेस महाविकास आघाडी शासन राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दर हेक्टरी पूर्वी ६८०० रुपये आर्थिक मदत मिळायची यात भरघोस वाढ करून, ती मदत आम्ही दहा हजार रुपये हेक्टरीपर्यंत वाढविली. यात शेतकऱ्यांचे इतर प्रश्‍न आमच्या निदर्शनास आले. पीकविमा योजनेच्या नावाखाली एरवी शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली, ती होऊ नये यावर प्रशासनाला दक्ष राहण्यास सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com