नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
शिरोळ, हातकणंगलेत महापुराची नुकसानभरपाई जमा : डॉ. खरात
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील ४०४६ नुकसानग्रस्तांना १४ कोटी ३६ लाख २६ हजार २८९ रुपये, तर हातकणंगले तालुक्यातील १७३४ नुकसानग्रस्तांना ६ कोटी ६८ लाख ८ हजार ५९० रुपयांची मदत खात्यावर जमा केली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी दिली.
एकूण २१ कोटी ४ लाख ३४ हजार ८७९ रुपये जमा केले आहेत. उद्योगांसाठी नुकसानीच्या ७५ टक्के अथवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये यापैकी, जी जास्त रक्कम असेल, ती अनुदान मदत स्वरूपात देण्यात आली.

डॉ. खरात म्हणाले, ‘‘शिरोळ तालुक्यातील नुकसानग्रस्त लहानसहान ४०४६ उद्योग व्यवसायांसाठी १४ कोटी ३६ लाख २६ हजार २८९ रुपये, २०८२ जनावरांच्या गोठ्यासाठी ६२.४६ लाख, यापूर्वी पूर्णत: पडझड झालेल्या २३९६ घरांसाठी ६ कोटी २९ लाख ८८ हजार रुपये, मृत ४५५ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची नुकसानभरपाई म्हणून ९१.१९ लाख रुपये देण्यात आले आहेत. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रारंभी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी १८ कोटी ८५ लाख ३५ हजार रुपये, नंतर प्रत्येक कुटुंबाला १० हजार या प्रमाणे २२ कोटी ९३ लाख १५ हजार रुपये जमा करण्यात आले.
निर्वाह भत्त्यापोटी ९ कोटी ७० लाख ८७ हजार ६९५ रुपये दिले गेले. याचा लाभ शहरी ८१५६ आणि ग्रामीण भागातील २९५५१ अशा एकूण ३७ हजार ७०७ कुटुंबांना झाला आहे. घरभाड्यापोटी शहरी भागात प्रत्येक कुटुंबाला ३६ हजार, तर ग्रामीण भागातील कुटुंबाला २४ हजार रुपये देण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील नुकसानग्रस्त १७३४ उद्योग व्यवसायांसाठी ६ कोटी ६८ लाख ८ हजार ५९० रुपये, ८८५ जनावरांच्या गोठ्यासाठी २६.५५ लाख, यापूर्वी पूर्णत: पडझड झालेल्या ७८१ घरांसाठी २ कोटी २६ हजार ९२ हजार रुपये, मृत १३४ गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्यांची नुकसानभरपाई म्हणून ३० लाख रुपये देण्यात आले. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून प्रारंभी ५ हजार रुपये सानुग्रह अनुदानापोटी ८ कोटी ८१ लाख ३० हजार रुपये ,नंतर बँक खात्यावर प्रत्येक कुटुंबाला १० हजार रुपयाप्रमाणे १४ कोटी ४९ लाख ८५ हजार रुपये जमा करण्यात आले.
निर्वाह भत्त्यापोटी २ कोटी ९१ लाख ९९ हजार ७६५ रुपये दिले गेले. याचा लाभ इचलकरंजीतील ८९१८ आणि ग्रामीण भागातील ९९६८ अशा एकूण १८ हजार ८८६ कुटुंबांना झाला आहे. महापुरामुळे स्थलांतरित व्हावे लागल्याने घरभाड्यापोटी शहरी भागात प्रत्येक कुटुंबाला ३६ हजार, तर ग्रामीण भागातील कुटुंबाला २४ हजार रुपये देण्यात आले, असेही डॉ. खरात यांनी सांगितले.
- 1 of 1027
- ››