अतिवृष्टीची ६३ लाखांची नुकसान भरपाई जमा

वाळवा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ५ हजार ८४३ ४३ शेतकऱ्यांचे १ हजार ४३४ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला होता. बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना ६३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे
अतिवृष्टीची ६३ लाखांची नुकसान भरपाई जमा Compensation of Rs. 63 lakhs for excess rain
अतिवृष्टीची ६३ लाखांची नुकसान भरपाई जमा Compensation of Rs. 63 lakhs for excess rain

नवेखेड, जि. सांगली  : वाळवा तालुक्यात अतिवृष्टीमुळे ५ हजार ८४३ ४३ शेतकऱ्यांचे १ हजार ४३४ हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला होता. बाधित झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना ६३ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. मात्र अद्याप १ कोटी २० लाखांचे अनुदान प्रलंबित आहे. वाळवा तालुक्‍यात सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळवा तालुक्‍यातील सोयाबीन, भात, हळद, आले, द्राक्षे, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान  झाले.  कोरोनामुळे आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांचा दृष्टीने अतिवृष्टी म्हणजे बुडत्याचा पाय खोलात, अशी अवस्था झाली होती. कारण हातातोंडाशी आलेला खरीप मातीमोल झाला होता. काढणी योग्य झालेली पिके वाया गेली होती. सरकारने अतिवृष्टीमध्ये बाधित पिकांना प्रतिगुंठा शंभर रुपये मदतीची घोषणा केली.  कृषी व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजन करून पंधरा दिवसांत बाधित पिकांचे पंचनामे केले व तत्काळ अहवाल पाठवला यामध्ये १ हजार ४३७ हेक्टर मधील पिके बाधित झाली. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे. परंतु, उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी नियोजन केले असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

प्रतिक्रिया पहिल्या टप्प्यात ६३ लाख इतकी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम लवकरच दुसऱ्या टप्प्यात जमा होईल. - भगवानराव माने, तालुका कृषी अधिकारी, इस्लामपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com