agriculture news in marathi, Compilation of digital signatures on satbara | Agrowon

डिजिटल सातबारावर मिश्रपिकांची नोंद होईना
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 ऑगस्ट 2018

जळगाव  : डिजिटल सातबारावर यंदाही मिश्रपिकांची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. एक हेक्‍टर तुरीच्या पिकात मुगाचे आंतरपीक किंवा मिश्रपीक घेत असलेल्या शेतकऱ्यांना हा अनुभव आला असून, ते तलाठी कार्यालयाचे खेटे घालून कंटाळले आहेत.
जिल्हाधिकारी यांनाही या समस्येबाबत पत्र त्यांनी दिले असून, शेतकरी हितासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जळगाव  : डिजिटल सातबारावर यंदाही मिश्रपिकांची नोंद होत नसल्याची स्थिती आहे. एक हेक्‍टर तुरीच्या पिकात मुगाचे आंतरपीक किंवा मिश्रपीक घेत असलेल्या शेतकऱ्यांना हा अनुभव आला असून, ते तलाठी कार्यालयाचे खेटे घालून कंटाळले आहेत.
जिल्हाधिकारी यांनाही या समस्येबाबत पत्र त्यांनी दिले असून, शेतकरी हितासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गाळण (ता. पाचोरा) येथील शेतकरी आतीष पाटील यांना हा अनुभव आला आहे. ते म्हणाले, ‘‘मागील वर्षी एक हेक्‍टर तुरीत मुगाचे आंतरपीक घेतले. तूर व मुगाचे दर खासगी बाजारात कमी असल्याने ते शासकीय धान्य खरेदी केंद्रात विक्री करण्याचे ठरविले. तेथे सातबारा मागतात. तलाठ्याकडे पीकपेऱ्याची आंतरपीक किंवा मिश्रपिकाची नोंद करून मागितली; पण त्याने ऑनलाइन किंवा डिजिटल सातबारात मिश्र पिकांची नोंदच नाही, असे म्हटले. या समस्येवर उपाय म्हणून तलाठ्याने ५० गुंठे तूर व ५० गुंठे मुगाची नोंद करा, असा सल्ला दिला. तसा होकार देऊन नोंद करून घेतली; पण जेव्हा शासकीय खरेदी केंद्रात तूर विक्रीसाठी गेलो तेव्हा हेक्‍टरी १० क्विंटलच तूर खरेदी करण्याची अट या केंद्राने लावली होती. मला तर हेक्‍टरी २५ क्विंटल तुरीचे उत्पादन आले. मग उर्वरित तुरीची विक्री खासगी बाजारात करण्याची वेळ आली.’’

मिश्रपिकांची नोंद डिजिटल सातबारावर करण्याबाबत मिश्रपिकांचा पर्यायच (ऑप्शन) डिजिटल यंत्रणेत दिलेला नसल्याचे तलाठी सांगतात. मिश्रपिकांची नोंद असलेला डिजिटल सातबारा हवा आहे. ती नोंद होत नसेल तर हस्तलिखित नोंद गृहीत धरावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कलिंगडांच्या जनुकीय प्रदेशांचा घेतला...आंतरराष्ट्रीय संशोधकांचा गट कलिंगडाच्या सात...
औरंगाबाद जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा...औरंगाबाद : मक्याला किमान आधारभूत किंमत मिळावी,...
सांगली जिल्ह्यात यंदा पावसाची ‘रेकॉर्ड...सांगली : जिल्ह्यात गेल्या २० वर्षातील सर्वाधिक...
युरिया ब्रिकेटची पन्हाळा तालुक्यात शंभर...कोल्हापूर : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन...
परभणीत साडेचार लाख हेक्टरवर पिके वायापरभणी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे...
शिरपूर उपबाजारात सोयाबीनची आवक वाढलीशिरपूर, जि. वाशीम  : सलग सुरू असलेला पाऊस...
पणन संचालकपदी कोणाची वर्णी लागणार?पुणे ः शेतमाल विपणनच्या ३०७ बाजार समित्या, ९००...
धक्कादायक ! कांदा नुकसानीच्या...नाशिक  : चालू वर्षी दुष्काळामुळे होरपळून...
अमरावती : रब्बी हंगाम क्षेत्रात होणार...अमरावती ः मॉन्सूनोत्तर पाऊस खरीप पिकांच्या मुळावर...
‘भातकुली’वर पाणीटंचाईचे सावटअमरावती  ः सुरुवातीला उघडीप त्यानंतर...
पुणे विभागात रब्बीचा चार लाख हेक्टरवर...पुणे  ः ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत...
साताऱ्यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून...सातारा ः अतिपावसाने शेती क्षेत्राचे कोट्यवधींचे...
पुणे बाजार समितीत ‘ई-नाम’ची अंमलबजावणी...पुणे :  शेतीमालाच्या ऑनलाइन लिलावांतून...
माण तालुक्यात पीक पंचनाम्यांमध्ये...दहिवडी, जि. सातारा  : पावसाने जोरदार तडाखा...
राज्यात अखेर राष्ट्रपती राजवटमुंबई ः चौदाव्या विधानसभेसाठी कोणत्याच...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस...कोल्हापूर  : यंदाच्या प्रतिकूल परिस्थितीच्या...
विमा प्रतिनिधी शोधताना शेतकऱ्यांची दमछाकयवतमाळ ः मॉन्सूनोत्तर पावसाने झालेल्या...
‘बुलबुल’ प्रभावित शेतकऱ्यांना मदत जाहीरभुवनेश्‍वर, ओडिशा:  राज्याला बुलबुल...
तण निर्मूलनातून तण व्यवस्थापनाकडेवास्तविक तण विज्ञानाचा संबंध विविध कृषी शाखांशी...
जळगावात कोबी १८०० ते ३००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...