Agriculture news in Marathi Complain if asked for money for cane | Page 4 ||| Agrowon

ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा : साखर आयुक्त गायकवाड

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021

ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी थेट साखर आयुक्तालयात तक्रार करावी, असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. 

पुणे ः ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी थेट साखर आयुक्तालयात तक्रार करावी, असे आवाहन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे. 

आयुक्तांनी याबाबत एक परिपत्रकच जारी केले आहे. ‘ऊसतोडीसाठी मजूर व मुकादम विविध कारणे सांगतात. पीक चांगले नाही, ऊस खराब आहे, ऊस पडलेला आहे, क्षेत्र अडचणीचे आहे, तोडणी करणे परवडत नाही, अशी कारणे सांगून शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास तोडणीस टाळाटाळ करतात. मजूर, मुकादम व वाहनचालकांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत’, असे या परिपत्रकात म्हटले आहे. 

चालू गाळप १५० दिवसांचे गाळप होईल इतकी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता आहे. इथेनॉलकडेही साखर वळविली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळप होईल की नाही, अशी शंका घेऊ नये. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी सर्व कारखान्यांनी तक्रारी स्वीकारण्यासाठी मोबाईल, व्हॉटॲप क्रमांक जारी करावेत, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. 

प्राप्त तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यास संबंधितांच्या  बिलातून रक्कम वसूल करावी व शेतकऱ्यास अदा करावी. ही जबाबदारी तक्रारनिवारण अधिकारीवर सोपवावी. चालू हंगामात तक्रार येणार नाही, याची दखल खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या प्रशासनाने घ्यावी, असेही आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

शेतकरी तक्रार कुठे करू शकतात?
तक्रारनिवारण अधिकारी म्हणून कारखान्यांनी आता शेती अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. त्याचे संपर्क क्रमांक सर्व ग्रामपंचायत सूचना फलकावर प्रसिद्ध करावे. शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्याकडे लेखी द्यावी. तसेच, साखर आयुक्तालयाच्या shetkari.madat@gmail.com या ई-मेलचा वापर करावा. तक्रारीमध्ये मजूर, मुकादम, वाहतूकदाराचे नाव व वाहन क्रमांक नमूद करावा, असे साखर आयुक्तांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...