कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात तक्रारी

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी वातावरण तापत आहे. या विरोधात एक संचालक ॲड. किरण पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधक अमर शिंदे यांच्यांकडे तक्रार दाखल केल्या होती.
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात तक्रारी

कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी वातावरण तापत आहे. या विरोधात एक संचालक ॲड. किरण पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधक अमर शिंदे यांच्यांकडे तक्रार दाखल केल्या होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी नोकरभरती प्रक्रिया सुरू होताच शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे, नाथाजी पाटील यांनी नोकरभरती विरोधात तक्रारी केल्या आहेत. याशिवाय अन्य तीन शेतकऱ्यांनी नव्याने याच विषयावर तक्रारी केल्या आहेत. या भरतीत नातेवाइकांची नावे घातल्याने आता या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. २९ जागा या पद्धतीने भरल्या आहेत. २०१९ मध्ये या जागा निघाल्या होत्या. पण निवडणुकांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. पण विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आल्याने या मंडळातील काही संचालकांनी गडबड करून ही भरती बेकायदेशीर पणे केल्याचा आरोप अन्य संचालकांनी केला आहे. नव्या नोकर भरतीमुळे वर्षाकाठी अंदाजे सहा कोटींचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे या भरतीविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा निबंधकाच्या निर्णयाकडे बाजार समितीचे लक्ष लागून राहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com