agriculture news in Marathi complaint against Kolhapur APMC recruitment Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात तक्रारी

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 जुलै 2020

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी वातावरण तापत आहे. या विरोधात एक संचालक ॲड. किरण पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधक अमर शिंदे यांच्यांकडे तक्रार दाखल केल्या होती.

कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या बेकायदेशीर नोकर भरती प्रकरणी वातावरण तापत आहे. या विरोधात एक संचालक ॲड. किरण पाटील यांनी पाच महिन्यांपूर्वी जिल्हा निबंधक अमर शिंदे यांच्यांकडे तक्रार दाखल केल्या होती. त्यानंतर तीन दिवसांपूर्वी नोकरभरती प्रक्रिया सुरू होताच शेतकरी प्रतिनिधी भगवान काटे, नाथाजी पाटील यांनी नोकरभरती विरोधात तक्रारी केल्या आहेत.

याशिवाय अन्य तीन शेतकऱ्यांनी नव्याने याच विषयावर तक्रारी केल्या आहेत. या भरतीत नातेवाइकांची नावे घातल्याने आता या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. २९ जागा या पद्धतीने भरल्या आहेत. २०१९ मध्ये या जागा निघाल्या होत्या. पण निवडणुकांमुळे ही प्रक्रिया रखडली होती. पण विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपत आल्याने या मंडळातील काही संचालकांनी गडबड करून ही भरती बेकायदेशीर पणे केल्याचा आरोप अन्य संचालकांनी केला आहे.

नव्या नोकर भरतीमुळे वर्षाकाठी अंदाजे सहा कोटींचा बोजा वाढणार आहे. त्यामुळे या भरतीविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे सहा तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याबाबत जिल्हा निबंधकाच्या निर्णयाकडे बाजार समितीचे लक्ष लागून राहिले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप पेरणीत अडीच लाख...पुणे ः यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने चांगली...
बिबट्याच्या पिंजऱ्यांशेजारीच बसून करणार...मंचर : वनखात्यानेही बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी...
खरीप पीक कर्जासाठी भाजपचा आज ठिय्याअमरावती : खरीप हंगाम अर्ध्यावर आला असतानासुद्धा...
औरंगाबादेत ग्राहकांचा रानभाज्या खरेदीला...औरंगाबाद ः आरोग्यदायी व अनेक औषधी गुणधर्म...
नगर जिल्ह्यात तुरीचा ५४ हजार हेक्टरवर...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला...
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ पैकी ४८ धरणे...रत्नागिरी ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी...
सांगलीत अडीच हजार क्विंटल मक्याची खरेदीसांगली ः जिल्ह्यातील तीन हमीभाव केंद्रांच्या...
निकृष्ट बियाणे पुरवठादार कंपन्यांवर...अमरावती: निकृष्ट दर्जाच्या बियाणे पुरवठा प्रकरणात...
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पीक...मराठवाडा विभागातील एकूण हवामान, पर्जन्यमान या...
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...