पपई दरांबाबत शेतकऱ्यांकडून पुन्हा तक्रार 

पपई दरांबाबत पुन्हा शेतकऱ्यांकडून तक्रार 
पपई दरांबाबत पुन्हा शेतकऱ्यांकडून तक्रार 

धुळे ः खानदेशात पपई दरांबाबत पुन्हा शेतकऱ्यांकडून तक्रारी येत आहे. कुठे चार रुपये तर कुठे पाच रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी दरांच्या विषयावरून काढणी बंद केल्याने आता एकाच वेळी सर्वत्र आवक वाढली आहे. यामुळे दरात पडझड होत असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.  

नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या संघटना व गटाने पपई काढणी बंद ठेवली. याबाबत शहादा बाजार समिती व नंतर शिरपुरातही बैठक झाली. आठ ते १० दिवस हा दरांचा गोंधळ चालला. नंतर सव्वाआठ रुपये प्रतिकिलोचे दर निश्‍चित झाले. परंतु मागील दोन दिवसांपासून पपईची खरेदी शहादासह शिरपूर व चोपडा भागातही चार रुपये प्रतिकिलोने थेट शेतात व्यापारी करीत आहेत. काही व्यापारी तर काढणीला नकारही देत आहेत. व्यापारी लॉबी शेतकऱ्यांची कोंडी करू लागली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली जात आहे. 

पपईची काढणीवर आलेली फळे दोन दिवसही काढणीविना राहिली तर फळांचा आकार बेढब बनतो, त्याचा दर्जा घसरतो. नेमके व्यापारी दोन-तीन दिवस काढणी रेंगाळत ठेवतात आणि नंतर कमी दरात खरेदी करतात. हा प्रकार सर्रास सुरू आहे. 

४२ दिवसांत दर १२ रुपयांनी झाले कमी  पपईचे दर नोव्हेंबरच्या सुरवातीला १४ ते १६ रुपये प्रतिकिलो असे होते. नंतर फारशी आवक वाढली नाही. शहादा व शिरपुरातही आवक २० नोव्हेंबरनंतर अधिक सुरू झाली. तर जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल व मुक्ताईनगरातही फारशी आवक अजूनही नाही. परंतु मागील ४२ दिवसात पपईचे दर १६ रुपयांवरून चार रुपये प्रतिकिलो असे खाली आणले आहेत. एवढी घसरण झाली, पण यासंदर्भात कुणीही मुद्दा करीत नसल्याचे शेतकरी राजू पाटील (चोपडा) म्हणाले. बडवानी, बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील व्यापारी दरांबाबत पिळवणूक करीत आहेत. तर शहादा व रावेरातील व्यापारीदेखील हवे तेवढे दर देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com