पुणे जिल्ह्यातील ५ हजार शाळांमध्ये तक्रार पेट्या

Complaint boxes in 5,000 schools in the district
Complaint boxes in 5,000 schools in the district

पुणे : पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ हजार १२४ शाळांमध्ये तक्रारपेट्या बसवण्यात आल्या आहेत. शाळेच्या परिसरात किंवा शाळेत येता-जाता प्रवासात विद्यार्थिनींची होणारी छेडछाड, विद्यार्थ्यांचे शोषण, वाहतूकदारांकडून होणारी पिळवणूक, रोडरोमिओंकडून होणारा त्रास अशा स्वरूपाच्या तक्रारी ही येथे लिखित स्वरूपात मुलींना देता येतात. विद्यार्थ्यांच्या शालाबाह्य तक्रारींचेही दखल शाळा व्यवस्थापनाकडून घेण्यात येणार आहे.

शाळेत जाता-येताना त्याचबरोबर काही वेळा शाळेत देखील मुलींना मुलांची शेरेबाजी सहन करावी लागते. मुली थेट शिक्षकांकडे तक्रार करण्यास धाडस करत नाहीत, त्यामुळे तक्रारपेटीत त्यांना तक्रार करणे शक्य होणार आहे. शाळांमध्ये तक्रार निवारण समिती नाही अशा शाळांना देखील तत्काळ समितीची स्थापना करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या आहेत. शिवाय ही तक्रारपेटी आठवड्यातून एकदा उघडून पाहणे आवश्यक आहे. 

पेटीतील सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. ज्या तक्रारी शालेय पातळीवर निकाली काढणे शक्य असतील त्या तत्काळ निकाली काढाव्यात. इतर तक्रारी मात्र क्षेत्रीय कार्यालयामार्फत शासनापर्यंत पोचवाव्यात, असे आदेशही शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. तक्रार करणाऱ्यांचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे यात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थिनींनी छेडछाड, महिला कर्मचाऱ्यांचा छळ यासंदर्भात अनेक प्रकरणे घडतात. पण दबावामुळे त्याच्या तक्रारीच करता येत नाहीत. अशा परिस्थितीत शाळेत जर तक्रार पेटी ठेवल्याने पीडित तक्रारी करू शकतील यासाठी शासननिर्णय काढण्यात आला. दर्शनी भागात ही तक्रारपेटी लावणे बंधनकारक केले आहे.

शासनाने तक्रारपेटी बसवण्याचे आदेश देऊन देखील अद्याप जिल्ह्यातील १०६ शाळांमध्ये तक्रार पेटी बसवण्यात आलेली नाही. 

शाळांमध्ये मुलींनी निनावी स्वरूपात तक्रार केली तरी त्याची दखल घेण्यात येईल. शिक्षकांना थेट सांगता येत नाही, त्यामुळे तक्रारपेटीद्वारे विद्यार्थ्यांना व्यक्त होता येईल. अभिनंदन, आभार आणि तक्रार या तीन प्रकारासाठी तक्रारपेटी उपयोगी ठरू शकते. शिक्षक चांगले काम करीत असतील किंवा चुकत असतील त्यासंदर्भात विद्यार्थ्यांना व्यक्त होता येणार आहे.  - सुनील कुऱ्हाडे,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com