Agriculture news in Marathi Complaint of inferior rice seeds to the Department of Agriculture | Agrowon

निकृष्ट भात बियाण्याची कृषी विभागाकडे तक्रार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

खरीप हंगामासाठी महाबीजकडून घेण्यात आलेले भात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार लांजा तालुक्यात पुढे आला आहे. काही गावातील भात रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात खेंड दिसून आली असून रोपांची वाढ खुंटली आहे.  याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत.

रत्नागिरी : खरीप हंगामासाठी महाबीजकडून घेण्यात आलेले भात बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा प्रकार लांजा तालुक्यात पुढे आला आहे. काही गावातील भात रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात खेंड दिसून आली असून रोपांची वाढ खुंटली आहे.  याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी आल्या आहेत.

शासनाच्या बियाणे महामंडळाकडून दरवर्षी खरीप हंगामात अनुदानावर आधारित कृषी सेवा केंद्राकडून भात आणि अन्य बियाणे वितरित केले जाते. २०२०-२१ च्या खरीप हंगामात लांजा खरेदी विक्री संघाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना २,६८० किलो भात बियाणे वितरित करण्यात आले होते. यामध्ये ज्या भात बियाणे ६४० किलोचे आहे. वेरळ येथील एका शेतात ज्या जातीच्या भात बियाण्याची लागवड करण्यात आली आहे. सध्या ही रोपे कमी उंचीची आहेत. त्यातील काही रोप वांझोटी असून त्यात तांदूळ मिळणे शक्य नाही. काही रोपांची उंची अधिक आहेत. त्याला लोम्बी लागलेली नाही. यातील काही रोप पावसामुळं पडली आहेत.

वेरळ बरोबर शिरंबवली, कणगवली, आसगे, खेरवसे, हसोळ, तळवडे, अंजनारी, प्रभानवली, खोरनीनको, वाडगाव या गावातही भात बियाण्याबाबत प्रकार दिसून आले आहेत. या भातात मोठ्या प्रमाणात खेंड ही असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत आढळून आले आहे. तालुक्यातील या बाधित क्षेत्राची पीक नियंत्रण समिती कडून पाहणी करण्यात येणार आहे.

वेरळ येथील शेतकरी काशिनाथ जाधव यांच्या शेताची नुकतीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. याबाबत लांजा तालुका कृषी अधिकारी ए. बी. धोंडे म्हणाले की, बियाण्याविषयी आलेल्या तक्रारीची शहानिशा सुरू आहे. कृषी सहायक पाहणी करत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. महाबीज मंडळ जिल्हा प्रतिनिधी यांना कळवण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून...वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस...
कांदा बियाण्याचे दर कडाडलेसातारा ः कांद्याचे दर आठ हजारापर्यंत पोचले आहे....
नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरणनगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या...
हळद पीक लागवडीसाठी सहकार्य ः कुलगुरू डॉ...दापोली, जि. रत्नागिरी ः कोकणातील हवामान हळद...
केळीचे दर घसरल्याने शेतकरी अडचणीतनांदेड : चांगल्या पावसामुळे यंदा खरीप हंगाम बहरला...
शाहू कृषी महाविद्यालयाच्या...कोल्हापूर : सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी...
खर्चाच्या तुलनेत दिलेली मदत तोकडी ः...औरंगाबाद : महाआघाडी सरकारने राज्यातील अतिवृष्टी,...
परभणी कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे...परभणी ः राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी...
पीक नुकसानप्रश्नी शेतकरी संघर्ष समितीचा...परभणी ः परतीच्या मॉन्सून पावसामुळे, धरणातील पाणी...
हापूस विक्री, निर्यातीला प्रोत्साहनपर...रत्नागिरी ः कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन (...
तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीचे एकात्मिक...तुरीवरील शेंग पोखरणाऱ्या अळीची अन्य पर्यायी नावे...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी...जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा...
खानदेशात कांदा लागवडीवर परिणाम होणारजळगाव ः खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे...अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे...
बॅलन्सशीट डोळ्यांसमोर ठेवून दिवाळी...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव कारखाना प्रशासनाने...
कृषी अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये ः...अमरावती : मोर्शी तालुक्‍यात जून ते ऑगस्ट या...
नांदेडमधील शेतकऱ्यांचा अतिवृष्टीने...नांदेड : जिल्ह्यात यंदा सप्टेंबर महिन्यात...
नगरमध्ये कापसाची व्यापाऱ्यांकडून अल्प...नगर ः कापसाला पाच हजार आठशे पन्नास रुपयांचा हमीदर...