धर्मा पाटील प्रकरणात तिघांवर गुन्हा नोंदवण्याची शिफारस

धर्मा पाटील प्रकरणात तिघांवर गुन्हा नोंदवण्याची शिफारस
धर्मा पाटील प्रकरणात तिघांवर गुन्हा नोंदवण्याची शिफारस

मुंबई : धुळे जिल्ह्यातील विखरण (ता. सिंदखेडा) येथील वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी दोन शासकीय अधिकाऱ्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसीलदार रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले अशी संबंधितांची नावे आहेत. धुळे जिल्ह्यात प्रस्तावित औष्णिक वीज प्रकल्पात शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन गेली होती. त्याबदल्यात त्यांना फक्त चार लाख रुपये भरपाई देण्यात आली होती. चार एकर जमिनीवर आंब्याची सहाशे झाडे होती. त्यासाठी ठिबक आणि सिंचनाची व्यवस्थाही केलेली होती. त्यामुळे संपादीत जमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी धर्मा पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी ते सलग तीन महिने मंत्रालयात येत होते. मात्र, मागणीची दखल घेतली जात नसल्याने ८० वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी २२ जानेवारी २०१८ ला मंत्रालयात विष प्राशन केले होते. यात त्यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला.  पाटील यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने धर्मा पाटील यांच्या जमिनीसह प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या १९९ हेक्टर शेतीचे फेरमूल्याकंन केले होते. सरकारने केलेल्या फेरमूल्याकंनानंतर धर्मा पाटील यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ झाली होती. धर्मा पाटील आणि त्यांच्या मुलाला ५४ लाख रुपये मोबदला देण्याचा अहवाल धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. तसेच सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश श्याम दरणे यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल राज्य मानवी हक्क आयोगाला सादर केला आहे.  या प्रकरणात तत्कालीन जमीन अधिग्रहण अधिकारी प्रतिभा सपकाळे, तहसीदार रोहिदास खैरनार आणि मध्यस्थ दत्तात्रय देसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची शिफारस समितीने केली आहे. या तिघांकडून कामात अनियमितता झाल्याचा ठपका समितीने अहवालात ठेवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com