विमा परताव्याच्या प्रश्नांवर तक्रारींचा पाऊस

विमा परताव्याच्या प्रश्नांवर तक्रारींचा पाऊस
विमा परताव्याच्या प्रश्नांवर तक्रारींचा पाऊस

औरंगाबाद : लातुरातील प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या लाभधारकांचं कोडं सुटलं तरी विमा परतावा मिळाला नाही, मिळाला तर संरक्षित रकमेच्या तुलनेत कमी मिळाला, काहींना मिळाला काहींना नाही. यांसह अनेक तक्रारींचा पाऊस प्रत्येक जिल्ह्यात होत असून, जालन्यात तर जिल्हाधिकारी कार्यालयात उघडलेल्या कक्षात विम्याविषयीच्या कैफियती मांडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

विमा भरल्याची पावती आहे. मंडळात त्या पिकाचा विमा मंजूर आहे. काहींना विमा परतावा मिळाला तर काहींना मिळत नाही, असं का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तर विमा परतव्याविषयी आपली गाऱ्हाणी मांडण्यासाठी एक कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्या कक्षात संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधीही आहेत. या कक्षात आपली गाऱ्हाने मांडण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत आहेत. ही बाब विमा परतवा शेतकऱ्यांना अजूनही मिळत नसल्याचे अधोरेखित करणारी ठरली आहे. सर्व पुरावे, विमावाले लोक व प्रशासन असताना लगेचच प्रश्न का सुटत नाही, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.

बॅंकेत कुटुंबातील सहा खात्यांत विम्याचा हप्ता एकाच वेळी भरला. पाच खात्यांवर कंपनीने संरक्षित रकमेच्या तुलनेत परतावा कमी मंजूर केला. तर एका खात्यावर अजून काहीच मिळालं नाही. - ईश्वर पाटील, तिडका, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद.

गतवर्षी विमा भरण्यासाठी तारीख वाढविल्याचा फायदा कुणालाच मिळाला नाही. गत हंगामात १ हेक्‍टर ७० आर क्षेत्राचा विमा उतरविला त्याचा परतावा अजून नाही. अनेक ऑनलान विमा भरणाऱ्यांना परतावाच नाही. - ज्ञानोबा तिडके, पांगरी, ता. परळी, जि. बीड.

आम्ही गत हंगामात सोयाबीन, मूग, उडदासाठी ११०४ रुपये विमा हप्ता भरला. त्याचा परतावा म्हणून मूग, उडदाचे १६२३ रुपये खात्यावर आले. सोयाबीनचा अजून रुपया नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष सुरू झाला. त्यात याविषयी माहिती दिली, तर महिन्यानं येईल म्हणतात. - अंगद डिक्‍कर, रेवगा, ता. जि. जालना

जिल्हाधिकारी कार्यालयातील तक्रार कक्षात भरलेलेल्या विमा रकमेचा परतावा नाही, म्हणून चौकशी केली तर माझा परतावा दुसऱ्याचा खात्यात गेल्याचं कळलं. त्यांनी पैसे कोणत्या खात्यात गेले हे टिपलंय. पाहू काय होतं ते. - दीपक जगताप, घोटन, ता. जि. जालना

३२० रुपये विमा हप्ता भरला. एक रुपयाही आला नाही. महिन्यापूर्वी विमा कंपनीच्या हेडऑफीसला भेटलो ते महिन्यानं येईल म्हणे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील कक्षात कळवलं तर तेथेही तेच उत्तर. पावती आहे, परतव्यासही पात्र, विमा मंजूर, कंपनीचेही लोक आहेत, मग लगेच प्रश्न का सुटत नाही कळत नाही. - सखाराम गोल्डे,रेवगा, ता. जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com