सर्व कामे पावसाळ्यापुर्वी पूर्ण करा : जिल्हाधिकारी चौधरी

औरंगाबाद: पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी (ता २२) जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना दिल्या.
Complete all works before monsoon: Collector Chaudhary
Complete all works before monsoon: Collector Chaudhary

औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी आवश्यक असणारी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी शुक्रवारी (ता २२) जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना दिल्या. 

मॉन्सूनपूर्व करावयाची सर्व कामे, घ्यावयाची खबरदारी, आवश्यक साधनसामुग्री, बचाव साहित्याबाबत सविस्तर आढावा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजोय चौधरी आदींसह वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती. ऑनलाइन माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती. 

तालुकास्तरावर आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीची तत्काळ मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडे करावी, अशा सूचनाही चौधरी यांनी दिल्या. जिल्ह्यातील रस्ते, पूल यांची तपासणी करून तसा अहवाल सादर करा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असणाऱ्या पथक प्रमुखांची नियुक्ती करावी. ग्रामपंचायत स्तरावर जिल्हा परिषदेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन दूषित पाण्याचा पुरवठा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

महावितरण कंपनीने दुरूस्तीची कामे वेळेत पूर्ण करावी. महानगरपालिकेनेही स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा. रस्त्यावरील उघडे मॅनहोल तत्काळ बुजविण्याचे कामही करावे. शहरातील धोकादायक इमारतींना तत्काळ नोटीस बजावा. बीएसएनल कंपनीने त्यांचे चेंबर्सही बुजवावे. यावेळी त्यांनी गंगापूर, वैजापूर आणि पैठण येथील बोटीची सद्यस्थिती आणि करावयाची कार्यवाही याबाबतही निर्देश दिले. 

तालुकास्तरावरील रस्त्यांची स्थिती तपासून पाण्याखाली जाणाऱ्या रस्त्यांबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तालुकास्तरावर मॉन्सूनपूर्व तयारी बैठक घ्यावी. जलतरणपटू, मदतीसाठी धावून येणारे स्वयंसेवक आदींची मुख्य संपर्क यादी तयार ठेवावी. दैनंदिन पर्जन्यमान योग्य आणि वेळेत घेण्यात यावे, अशा सूचनाही चौधरी यांनी केल्या.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com