नागपुरात सर्वच पक्षात वाढली बंडखोरी

विधानसभेसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
विधानसभेसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

नागपूर  ः दावेदारी असूनदेखील तिकीट न मिळाल्याने सर्वच पक्षातील नाराजांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले. सोमवार (ता. ७) पर्यंतच उमेदवारी मागे घेता येणार असल्याने पक्षनेत्यांना या बंडखोरांची मनधरणी करण्याचे काम तीन दिवसांत करावे लागणार आहे.  या वेळी दक्षिण नागपुरात सर्वाधिक बंडखोरी अनुभवता आली आहे. भाजपचे माजी उपमहापौर सतीश होले, शिवसेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजू नागूलवार, प्रदेश सचिव योगेश कुंभलकर, काँग्रेसचे प्रमोद मानमोडे यांनी देखील बंडाचे निशान फडकावित उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  भाजपशी जुळलेले मनोज सिंह यांनी पश्‍चिम नागपुरातून नामांकन भरले. उत्तर नागपुरात मनोज सांगाळे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करीत अर्ज भरला. सांगोळे हे चारवेळा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. याच मतदारसंघात बहुजन समाज पक्षाकडून सुरेश साखरे यांनी अर्ज भरला असतानादेखील त्याच पक्षाचे नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार व बुध्दम राऊत यांनी देखील उमेदवारी दाखल केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांनी पूर्व नागपुरातून बंड केले. महापालिकेतील एकमेव अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी देखील याच मतदारसंघातून अर्ज भरला आहे. मध्य नागपुरातून काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर हे देखील मैदानात उतरले आहेत. आता या बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रत्येकच पक्षाला कसरत करावी लागणार आहे.  रामटेक मतदारसंघात राज्य खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष ॲड. आशिष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. भाजप शिवसेनेला त्यांनी धक्‍का दिल्याची चर्चा यामुळे रंगली आहे. रामटेकची जागा युतीत शिवसेनेला सुटावी यासाठी जयस्वाल आग्रही होते. मात्र, भाजपला ही जागा सुटल्याने जयस्वाल यांनी बंड केले आहे.  सावनेरमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राठी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राठी येथे भाजपच्या उमेदवारीसाठी आग्रही होते. कामठीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कंभाले यांनी त्यासोबतच उमरेडमध्ये शिवसेनेचे देवीदास धारगावे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com