`ई-पीक पाहणी चौदा ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा`

नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाइन करण्यासाठी ई-पीकपाहणी प्रकल्प सुरू आहे. १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला.
Complete the e-crop survey by October 14
Complete the e-crop survey by October 14

नाशिक : ‘‘शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल ॲपच्या आधारे शेतकऱ्यांनी स्वतः पीक पेरणीची माहिती स्वतः ऑनलाइन करण्यासाठी ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू आहे. १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. यास शेतकऱ्यांनी शासनाने त्यांच्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थक करून दाखविला आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणी प्रकल्पाचे कामकाज १०० टक्के पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांनी १४ ऑक्टोबरपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी. त्यात काही अडचणी आल्यास आपल्या गावातील तलाठ्याशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.

गमे म्हणाले,‘‘क्षेत्रीय स्तरावरून वास्तविक वेळेत पिकांची माहिती संकलित करणे, माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक पाहणी प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे, शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या सरकारी योजनांच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी माहिती वापरणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेचा थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यामुळे कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याची निश्‍चित आकडेवारी सहज उपलब्ध होईल.’’  

विभागातील झालेले काम 

नाशिक विभागात धुळे जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे ६७.०४ टक्के झाले आहे. जळगाव जिल्ह्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे ५९.३१ टक्के झाले आहे. जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात ई-पीक पाहणीचे कामकाज हे  ९४.५२ टक्के झाले आहे. कळवण तालुक्यात देखील कामकाज हे ७४.५६ टक्के, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात ई-पीक पाहणीचे काम हे ७२.८४ टक्के, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात देखील ई-पीक पाहणीचे कामकाज हे ७१.४३ टक्के झाले आहे. विभागातील इतरही तालुक्यांत शेतकऱ्यांकडून या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com