परभणी ः विजेची देखभाल, दुरूस्तीची कामे पूर्ण करा

सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वीज वाहिन्या, विद्युत प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना गती देऊन ती वेळत पूर्ण करावीत, असे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.
Complete electrical maintenance, repairs
Complete electrical maintenance, repairs

परभणी ः यंदा विविध प्रकल्पांची जलाशये तसेच विहिरी आदी सिंचन स्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रब्बी हंगामात लागणाऱ्या पाणी उपशासाठी शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना योग्य दाबाने, सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी वीज वाहिन्या, विद्युत प्रणालीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना गती देऊन ती वेळत पूर्ण करावीत, असे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांना रब्बी हंगामात योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा करण्याचे निर्देशित केलेले होते. त्यानुसार लघुदाब वाहिन्यांचे जोड व्यवस्थित करणे, पीव्हीसी स्पेसर बसविणे रस्त्या लगतच्या व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डिंगची तपासणी करणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे अथवा नवीन गार्डिंग करणे. जीर्ण झालेल्या तारा व वीज खांब बदलणे, वाकडे झालेले पोल सरळ करणे, सैल झालेल्या तारा सरळ करणे, वीज खांबाचे अर्थिंग तपासणे, त्याच बरोबर उच्चदाब वाहिनीची देखभाल व दुरुस्ती करणे. रोहित्रांच्या तेलाची गळती थांबविणे, अर्थिंग तपासणे, सिलिका जेल बदली करणे, डीओ फ्यूज कॅपॅसिटी तपासणी व बदली करणे, उपकेंद्रामधील नादुरुस्त सीटी, पीटी, ब्रेकर, रोटरी स्वीच बदली व दुरुस्त करणे, आयसोलेटर, बॅटरी चॅर्जरची देखभाल करणे तसेच, उपकेंद्रामधील वाहिनी व रोहित्रांचे प्रोटेक्शन चाचणी विभागाकडून तपासणी करणे अशा प्रकारची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यात यावीत, असेही निर्देश दिले.

सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील अनधिकृत कृषिपंपाच्या वापरावर निर्बंध आणावेत. त्याचबरोबर सर्व अधीक्षक अभियंत्यांनी रब्बी हंगामाचे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे.  - दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com