हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८ हजार ४०३ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.
ताज्या घडामोडी
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करा ः बच्चू कडू
सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्ण करून वेळेत प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी संबंधित अभियंता यांनी दिले.
अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील ३९ गाव, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील सहा गावांना सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रकल्प निर्माण होत असून, शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्ण करून वेळेत प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी संबंधित अभियंता यांनी दिले.
राज्यमंत्री कडू यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन कामांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. पेढी प्रकल्पाचे मुख्य अभियंता आ. तु. देवगडे, कार्यकारी अभियंता वि. भ. बागूल, उपविभागीय अभियंता ध. नि. नखाते, अ. रा. भुते आदी या वेळी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी अभियंता श्री. बागूल यांनी पेढी प्रकल्पा संदर्भात नियोजन व त्याअनुषंगाने सिंचन क्षेत्र याबाबत राज्यमंत्री श्री. कडू यांना माहिती दिली. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रात दाबयुक्त बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे पाणी वाहून नेले जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण ४५ गावांना सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून प्रकल्प निर्मितीचे काम होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
प्रकल्प शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभदायी ठरावा यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी खात्याला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पाणी वाहून नेणारे पाइप जमिनीखाली टाकण्याचे प्रस्तावित असल्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावर राज्यमंत्री म्हणाले, की पाइप जमिनीखालून टाकण्याच्या कामासाठी आवश्यक असलेली जमीन काही कालावधीकरिता संबंधित शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळू शकेल, असे आवाहनही श्री. कडू यांनी या वेळी केले.
राज्यमंत्री कडू म्हणाले...
- निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती, अकोल्यासाठी महत्त्वपूर्ण
- भातकुलीतील ३९ गावे, मूर्तिजापूरमधील सहा गावांना सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्वत सिंचन सुविधा
- पंपगृहासाठी सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करून संपूर्ण योजना यावर चालविली जावी
- 1 of 1099
- ››