Agriculture news in Marathi Complete the following generation project on time: Bachchu Kadu | Page 3 ||| Agrowon

निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करा ः बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्ण करून वेळेत प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी संबंधित अभियंता यांनी दिले.

अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यात भातकुली तालुक्यातील ३९ गाव, अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यातील सहा गावांना सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्‍वत सिंचनाची सुविधा मिळणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रकल्प निर्माण होत असून, शेतकऱ्यांना शाश्‍वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे प्रकल्पाचे काम नियोजनपूर्वक व गुणवत्तापूर्ण करून वेळेत प्रकल्प पूर्णत्वास न्यावा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी संबंधित अभियंता यांनी दिले.

राज्यमंत्री कडू यांनी प्रत्यक्ष प्रकल्पाला भेट देऊन कामांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. पेढी प्रकल्पाचे मुख्य अभियंता आ. तु. देवगडे, कार्यकारी अभियंता वि. भ. बागूल, उपविभागीय अभियंता ध. नि. नखाते, अ. रा. भुते आदी या वेळी उपस्थित होते.

प्रारंभी कार्यकारी अभियंता श्री. बागूल यांनी पेढी प्रकल्पा संदर्भात नियोजन व त्याअनुषंगाने सिंचन क्षेत्र याबाबत राज्यमंत्री श्री. कडू यांना माहिती दिली. प्रकल्पांतर्गत येणाऱ्या लाभ क्षेत्रात दाबयुक्त बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे पाणी वाहून नेले जाणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून एकूण ४५ गावांना सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन सुविधा निर्माण होणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून प्रकल्प निर्मितीचे काम होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रकल्प शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभदायी ठरावा यासाठी ठिबक‍ सिंचन किंवा तुषार सिंचन योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी कृषी खात्याला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही त्यांनी दिल्या. पाणी वाहून नेणारे पाइप जमिनीखाली टाकण्याचे प्रस्तावित असल्याचे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावर राज्यमंत्री म्हणाले, की पाइप जमिनीखालून टाकण्याच्या कामासाठी आवश्यक असलेली जमीन काही कालावधीकरिता संबंधित शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना लवकरात लवकर सिंचनाचा लाभ मिळू शकेल, असे आवाहनही श्री. कडू यांनी या वेळी केले.

राज्यमंत्री कडू म्हणाले...

  •   निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती, अकोल्यासाठी महत्त्वपूर्ण
  •   भातकुलीतील ३९ गावे, मूर्तिजापूरमधील सहा गावांना सुमारे १२ हजार २३० हेक्टर जमिनीवर शाश्‍वत सिंचन सुविधा
  •   पंपगृहासाठी सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करून संपूर्ण योजना यावर चालविली जावी

इतर ताज्या घडामोडी
उन्हाळी कांदा पिकाची काढणी, साठवणूक कांदा पिकाच्या दर्जेदार उत्पादनासाठी जमिनीची निवड...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आणखीन निधी ः...मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व...
खरिपापूर्वी कृषी विक्रेत्यांना कोरोना...नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जनजीवन...
धान बोनस लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ः...भंडारा : महाविकास आघाडी शेतकरी हितासाठी बांधील...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
पांदण रस्ता मोकळा करा, अन्यथा...नागपूर : शेतापर्यंत जाणारी वाट एका शेतकऱ्याने...
जैविक उत्पादनांच्या बाजारपेठेला फटका...पुणे : राज्यातील जैविक खते व जैव उत्तेजकांच्या...
सातारा जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतकरी...सातारा : जिल्ह्यात कोरेगाव, खटाव, माण...
जालना जिल्ह्यात तेरा हजार क्‍विंटल...जालना : जिल्ह्यात किमान आधारभूत किमतीने खरेदी...
अकोला जिल्ह्यात सोयाबीनचे हवे ६० हजार...अकोला ः जिल्ह्यात यंदा सोयाबीन व कपाशीच्या...
वऱ्हाडात ‘पूर्वमोसमी’ची वादळी हजेरीअकोला ः वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बुधवारी...
नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी...नाशिक : जिल्ह्यात विविध भागांत तुरळक पूर्वमोसमी...
सिंधुदुर्गात ८२ हजार क्विंटल भातखरेदीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात या वर्षी विक्रमी...
प्रत्यक्षात तक्रारदारच नसल्याची माहिती...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो...
रत्नागिरीत २३ हजार क्विंटल भात खरेदीरत्नागिरी ः महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह...
आटपाडी तालुक्यातील अनेक गावांत गारपीटआटपाडी, जि. सांगली : तालुक्‍यात बुधवार (ता.१४)...
‘चित्री’ प्रकल्पात पाण्याची उपलब्धता...आजरा, जि कोल्हापूर : ‘चित्री’ प्रकल्पामध्ये...
जळगाव जिल्हा बँकेचे पीककर्ज रोखीने...जळगाव ः जिल्ह्यात पीककर्ज वितरणात आघाडीवर...
केंद्रीय जैव उत्तेजके समितीची स्थापना पुणे : जैव उत्तेजके किंवा ‘पीजीपी’ (प्लांट ग्रोध...
कोकणातून हापूसच्या ३४ हजार पेट्या रवानारत्नागिरी ः गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून...