वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा : पापळकर

वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा : पापळकर
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करा : पापळकर

अकोला : वाढते तापमान व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाला देण्यात आलेले वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. यासाठी विभागांनी प्राथमिक तत्त्वांवर वृक्ष लागवडीच्‍या जागेची निश्चिती करून येत्या पाच मेपर्यंत खड्डे तयार करण्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

शुक्रवारी (ता. २६) येथे नियोजन भवनात आयोजित विविध विषयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक वळवी, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे उपस्थित होते.

पापळकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील पडीक जमीन, रस्त्यांच्या दुर्तफा, शासकीय जमीन, वनजमीन तसेच विविध विभागाच्या कार्यालयाच्या परिसरातील जमिनीवर ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत वृक्ष लागवड करून जोपासना करावी. यासाठी महसूल विभागातील उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी आपल्या क्षेत्रातील शासकीय जमिनीची यादी तयार करावी. ती विविध विभागांना उद्दिष्ट पूर्तीसाठी उपलब्ध करून द्यावी. जलयुक्त शिवार योजनेतील कामे येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी.‘‘

पाणीटंचाई, पादंण रस्ते मोकळे करणे, मनरेगा व नरेगा विहिरी, मुख्यमंत्री पेयजल योजना आदी योजनांचा आढावा त्यांनी या वेळी घेतला.

मनरेगा योजनेतंर्गतच्या विहिरींना विद्युतपुरवठा करण्यासाठी महावितरणतर्फे सौर विद्युत जोडणी करण्यात येणार आहे. विविध विभागांच्या  कार्यालयांमध्ये सोलर रूफ टॉप योजनेद्वारे महावितरणतर्फे सौर विद्युत जोडणी करण्यात येईल. शासकीय कार्यालयांनी आपल्या इमारतीच्या क्षेत्र फळाची यादी त्वरित महावितरण कंपनीकडे पाठवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिल्या.

शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विविध योजनेखाली मिळालेल्या विहिरींची नोंद व्यवस्थित होत नाही, अशा तक्रारी जिल्हा परिषदकडे प्राप्त झाल्या आहेत. ग्रामसेवकांच्या सहकार्याने तलाठ्यांनी अद्ययावत नोंद सातबारामध्ये करावी, अशा सूचना प्रसाद यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com