सोलापूर जिल्ह्यातील वादळवाऱ्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण

गावपातळीवरील महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व भागातील पंचनामे पूर्ण झाले. येत्या दोन-तीन दिवसांत त्यासंबंधीची एकत्रित माहिती जमा करून मदतीसाठी सविस्तर अहवाल तयार करून सरकारकडे पाठवला जाईल. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
सोलापूर जिल्ह्यातील वादळवाऱ्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण
सोलापूर जिल्ह्यातील वादळवाऱ्यातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण

सोलापूर : जिल्ह्याला पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे दहा दिवसांपूर्वी मोठा फटका बसला. प्रामुख्याने केळी, डाळिंब, लिंबू, द्राक्ष या पिकांचे त्यात मोठे नुकसान झाले. सुमारे तीनशे हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील फळपिके त्यात जमीनदोस्त झाली. सध्या सर्व क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. या पंचनाम्याचे अहवाल येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हास्तरावर आल्यानंतर मदतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. प्रत्यक्षात मदत किती आणि कधी मिळणार, हे मात्र अद्याप स्पष्ट नसल्याची माहिती मिळाली. 

मृग नक्षत्राच्या आधी चार दिवस ३ जूनला जिल्ह्यात पाऊस आणि वादळा वाऱ्याने मोठा दणका दिला. केवळ शेती पिकांचेच नाही, तर अनेक भागांत घरावरील पत्रे उडाले. झाडे कोसळली. करमाळा, माळशिरस, माढा, सांगोला, बार्शी या भागांत सर्वाधिक नुकसान झाले. करमाळ्यातील विशेषतः केम, सातोली, पाथुर्डी, मलवडी, कंदर, वांगी, वडशिवणे भागात ११० हेक्‍टरवरील केळी बागांसह अन्य पिकांचे नुकसान झाले. 

माळशिरसमधील माळीनगर, वेळापूर, म्हाळुंग, मळोली, निमगाव भागात, तर माढ्यातील टेंभुर्णी, बेंबळे, अकोले परिसरात वादळवाऱ्याने धुडगूस घातला. या भागातही शंभराहून अधिक हेक्‍टरवरील फळबागांचे नुकसान झाले. पावसापेक्षा सर्वाधिक वादळवारेच अधिक झाले. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाद्वारे नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. सध्या हे पंचनाम्याचे काम जवळपास संपले आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३०० हेक्‍टपर्यंत नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडे आहे. 

जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या सहीने मदतीसाठी हा अहवाल शासनाकडे जाईल. त्यानंतर मदत मिळेल. पण ही मदत किती आणि कधी मिळेल, याबाबत मात्र सांगता येत नाही, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com