भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा : भरणे

सोलापूर : ‘‘उजनी ते सोरेगावपर्यंतच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने करा,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.
 Complete the land acquisition process quickly : Bharne
Complete the land acquisition process quickly : Bharne

सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम गतीने करा,’’ अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिल्या.

सोलापूरला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उजनी धरणातून आणखी एक ११० किमी लांबीची पाईपलाईन मंजूर झाली आहे. ही पाईपलाईन संपूर्ण जमिनीखालून असणार आहे. याबाबतच्या आढावा बैठकीत भरणे यांनी सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, स्मार्ट सीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी  त्रिंबक ढेंगळे-पाटील, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्यासह स्मार्ट सिटीचे सदस्य, अधिकारी उपस्थित होते. 

भरणे म्हणाले, ‘‘पाईपलाईनचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईन जमिनीखालून असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होणार नाही. त्यांना त्या जमिनीवर सर्व पिके घेता येतील. यामुळे शेतकऱ्यांनी पाईपलाईनसाठी अडवणूक करू नये. 

१३८ हेक्टर होणार बाधित 

उजनीवरुन सोलापूरकडे जाणारी ही पाईपलाईन माढा, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून जात आहे. यात ३५ गावांचा समावेश आहे. १३८ हेक्टरच्या वापर हक्कासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. ३५ पैकी ३४ गावांतील मोजणीचे कामही झाले आहे. बाधित जमिनीवरील वृक्ष, शेती, घरे यांचे पंचनामे व मूल्यांकन करण्याचे काम त्वरित सुरू होईल, असे उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले.

पुढील २१ दिवसांत प्रक्रिया

राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. त्यानुसार शासनाकडून वापर हक्काच्या संपादनाबाबत निर्णय घेतला आहे. पुढच्या २१ दिवसांत बाधित खातेदारांच्या लेखी हरकती घेऊन ३० दिवसांत हरकतीवर सुनावणी होईल, असे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com