Agriculture news in marathi, Complete lining of canal in Attapadi | Agrowon

आटपाडीतील कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

खरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२ किलोमीटरमधील टेंभू योजनेच्या मुख्य कालवा अस्तरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू होते. ते पूर्ण झाल्याने पाण्याची गळती थांबली आहे. अजूनही कालव्यांचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी राहिल्याचीही स्थिती आहे. 

खरसुंडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्यातील ३२ किलोमीटरमधील टेंभू योजनेच्या मुख्य कालवा अस्तरीकरणाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू होते. ते पूर्ण झाल्याने पाण्याची गळती थांबली आहे. अजूनही कालव्यांचे अस्तरीकरण अनेक ठिकाणी राहिल्याचीही स्थिती आहे. 

दुष्काळी भागासाठी असणारी टेंभू योजना सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव, खानापूर, आटपाडी सांगोला व कवठेमंकाळ असा प्रवास सुरू आहे. मुख्य कालवा चार तालुक्यांतून जातो. आटपाडी तालुक्यात तो ३२ किमी आहे. त्याचे अस्तरीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यातील कालव्यास पाणी सोडण्यासाठी १६ प्रवेशद्वार बसवण्यात आली आहेत. त्याचबरोबर सध्या बंदिस्त पाइपद्वारे काम सुरू आहे. या ठिकाणीही प्रवेशद्वारीची सुविधा ठेवली जाणार आहे.

वर्षातून तीन वेळा शेतकऱ्यांच्या मागणीनुसार योजनेस पाणी सोडण्यात येते. त्यानंतर शेतकऱ्यांकडून पैसे भरून जलसंपदा विभाग पाणी वितरण करते. अजून तालुक्यातील सर्वच भागांत पाणी पोचले नाही. समन्यायी समान पाणीवाटप या नियमानुसार बंदिस्त पाइपद्वारे तालुक्यातील सर्व गावात ही योजना पूर्णत्वास जाईल. त्या वेळी सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळू शकेल. मात्र, हे काम होण्यास अजून एक वर्षाचा कालावधी लागेल, अशी शक्यता आहे.

सध्या तालुक्यात दोन ठिकाणी बंदिस्त पाइपचे काम सुरू आहे. कामास गती नसल्यामुळे वेळ लागत आहे. टेंभू योजनेचे सर्व पंप सुरू नसल्याने पाणी कमी प्रमाणात येत आहे. सर्व पंप सुरू झाल्यास पूर्ण क्षमतेने पाणी तालुक्यात येईल. त्या वेळी तालुक्यातील सर्व तलाव बंधारे भरण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील साठवण तलावात मोठा पाऊस नसल्याने पाणी आले नाही. आता हे तलाव टेंभू योजनेच्या पाण्याने भरले जाणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...