कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण कराः नाना पटोले

शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेतील त्रुटी दूर करुन जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
nana patole
nana patole

भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेतील त्रुटी दूर करुन जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात नाना पटोले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्‍याम भुगावकर विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.  नाना पटोले म्हणाले, कर्जमुक्‍ती योजनेसाठी पात्र परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना चालु खरीप हंगामात पीककर्ज मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत व केवळ आधारकार्डाचे प्रमाणीकरण राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हयात १४ हजार ८१४ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ७ हजार १८३ शेतकऱ्यांना २९ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज मिळणे बाकी आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमधील ८ हजार ८४८ शेतकऱ्यांना २६ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांची कर्जमाफी अजून व्हायची आहे. त्यामुळे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वाढणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे यांनी दिली.  जिल्ह्यातील ३१ हजार ५७४ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यातील २० हजार ७१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी एकूण १ हजार २३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या ऑनलाइन तक्रारी जिल्हास्तरीय समिती व आधारप्रमाणीकरण होत नसल्याबाबत तहसीलदारांकडे प्राप्त झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com