agriculture news in Marathi complete loan waiver scheme till 30 June Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कर्जमुक्‍ती योजनेची प्रक्रिया ३० जूनपर्यंत पूर्ण कराः नाना पटोले

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 जून 2020

शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेतील त्रुटी दूर करुन जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

भंडारा ः शासनाने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेतील त्रुटी दूर करुन जिल्ह्यात ३० जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाना पटोले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्‍याम भुगावकर विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

नाना पटोले म्हणाले, कर्जमुक्‍ती योजनेसाठी पात्र परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना चालु खरीप हंगामात पीककर्ज मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत व केवळ आधारकार्डाचे प्रमाणीकरण राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जिल्हयात १४ हजार ८१४ शेतकऱ्यांना ११ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ७ हजार १८३ शेतकऱ्यांना २९ कोटी ५६ लाख रुपयांचे कर्ज मिळणे बाकी आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेमधील ८ हजार ८४८ शेतकऱ्यांना २६ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांची कर्जमाफी अजून व्हायची आहे. त्यामुळे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट वाढणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे महाव्यवस्थापक संजय बरडे यांनी दिली. 

जिल्ह्यातील ३१ हजार ५७४ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यातील २० हजार ७१ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. त्यापैकी एकूण १ हजार २३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याच्या ऑनलाइन तक्रारी जिल्हास्तरीय समिती व आधारप्रमाणीकरण होत नसल्याबाबत तहसीलदारांकडे प्राप्त झाल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
सोलापुरात टोमॅटो, वांगी, हिरव्या...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात कोथिंबिरीच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
लसणाच्या आवकेत वाढ; उठावामुळे दरांत...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
औरंगाबादमध्ये ढोबळी मिरची, कोबी, भेंडी...औरंगाबाद:  येथील कृषी उत्पन्न बाजार...
अकोले तालुक्यात भात लागवडीचे प्रमाण कमीचनगर  : अकोले तालुक्यात अद्यापपर्यंत जोरदार...
बियाणे उगवणीबाबत नगरमध्ये ७६८ तक्रारीनगर  ः सोयाबीन, बाजरीच्या निकृष्ट...
लोणावळा येथे सर्वाधिक पावसाची नोंदपुणे  ः पुणे जिल्ह्यातील बहुतांश भागात...
मुंबई, ठाण्यात पावसाचा जोरमुंबई  : मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीत...
म्हैसाळ योजनेची दोन कोटींची पाणीपट्टी...सांगली  : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा कमी जोररत्नागिरी  ः जिल्ह्यात शनिवारी (ता.४) जोरदार...
भिवापुरी मिरचीच्या उत्पादकता वाढीसाठी...नागपूर  : भौगोलिक मानांकन मिळालेल्या आणि...
आधुनिक कृषी तंत्रज्ञान बांधापर्यंत...यवतमाळ : कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार...
महागाव तालुक्यात अल्प पावसामुळे पिकांची...अंबोडा, जि. यवतमाळ  ः महागाव तालुक्यात...
भंडारदरा परिसरात आढळला घोयरा सरडा अकोले, जि. नगर ः घोयरा सरडा अर्थातच श्यामेलिएओन...
खरिपातील धानाला देणार २५०० रुपयांचा दर...भंडारा  ः केंद्र सरकारकडून धानाला हमीभाव...
नांदेड जिल्ह्यात ८० टक्के क्षेत्रावर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८९५...
नांदेड जिल्ह्यात हरभऱ्याची सव्वा लाख...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
पुण्यात भाजीपाल्याची आवक वाढली; दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
आर्क्टिक वनस्पती कर्ब शोषण्यापेक्षा...आर्क्टिक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या उंच झाडे किंवा...
कोरडवाहू कपाशीचे लागवड नियोजनअयोग्य जमिनीवरील बीटी कपाशीची लागवड, लागवडीचे...