दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
`मका खरेदीची प्रक्रिया शुक्रवारपर्यंत पूर्ण करा`
नाशिक: ‘‘मका खरेदीसाठी शासनाने ३२ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याच्या आत शुक्रवारपर्यंत (ता. २९) संपूर्ण मका खरेदी करावी,’’ असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

भुजबळ हे रविवारी (ता.२४) येवला दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मका खरेदीसह प्रलंबित विकासकामांची सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तहसीलदार प्रमोद हिले, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, महावितरण विभागाच्या उपअभियंता पिनल दुसाने, उमेश चौधरी, गटविकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, ‘‘मका खरेदीसाठी शासनाने दिलेल्या मुदतीच्या आत मका खरेदी होणे आवश्यक आहे. त्यासाठी रात्रंदिवस खरेदी सुरू ठेऊन २९ तारखेपर्यंत मका खरेदी पूर्ण करावी. कोणत्याही शेतकऱ्यांची मका शिल्लक राहू नये.’’
- 1 of 1054
- ››