गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा

गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा
गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा

नाशिक : नाशिक जिल्ह्यात जूनपर्यंत पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे. तरीही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाराटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी गाळपेराची कार्यवाही तात्काळ पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. १०) जिल्हा प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरातील महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कृषी, पशुधन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील उपलब्ध चाऱ्याची माहिती सुरुवातीला घेण्यात आली. जिल्ह्यात १५ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. तो जून २०१९ पर्यंत पुरू शकतो. त्यामुळे जिल्ह्यात चारा छावण्यांची गरज भासणार नाही, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

धरणांच्या गाळपेर क्षेत्रात चाऱ्याची लागवड करण्याच्या सूचना राज्य सरकारने नुकत्याच केल्या. जिल्ह्यात १५०० हेक्टर क्षेत्र निश्चित केल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. एकूण ४१ प्रकल्पांमध्ये चारा लागवड करण्यात येईल. त्यामध्ये ११ मोठ्या, पाच मध्यम, तर २५ लहान प्रकल्पांचा समावेश आहे. दुष्काळ निवारणासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये कामे होतात. सिन्नर आणि चांदवड तालुक्यातील गावे निवडून फाउंडेशनने यापूर्वी कामे केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते. त्यापूर्वी गावांची निवड करावी, अशा सूचना दिल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.

२० डिसेंबरपासून लागवड

चारा लागवडीसाठी बियाण्यांचा अंदाज घेऊन २० डिसेंबरपासून लागवडीला सुरवात व्हावी, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली. चाऱ्याचे उत्पादन करू इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com