ईव्हीएम मशिन्सची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

ईव्हीएम मशिन्सची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण
ईव्हीएम मशिन्सची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदारसंघांसाठी विविध ठिकाणांहून बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली. त्यांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (ता. १) पूर्ण करण्यात आली. त्यामुळे आता कोणते ईव्हीएम मशिन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे या प्रक्रियेमुळे निश्‍चित करण्यात आले.

अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ येथे ईव्हीएम सरमिसळ प्रक्रियेवेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. 

भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित EMS (EVM Mangement System) यामध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे २० व ३० टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात आली.

मंगळवारी संगणकीय प्रणालीच्या मदतीने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण करण्यात आली. त्याअंतर्गत मतदारसंघनिहाय यंत्रांचे वाटप होईल. व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतूक करताना ते अत्यंत काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे. तसेच मतदान केंद्रांपर्यंत व्हीव्हीपॅट मशिन घेऊन जाताना ते ट्रान्स्पोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे आहे. 

विधानसभा मतदारसंघनिहाय १५ मतदारसंघात ४ हजार ५७९ मतदान केंद्रांना प्रत्येकी ५ हजार ५०१ बॅलेट व कंट्रोल युनिट आणि ५ हजार ९६१ व्हीव्हीपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्‍चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया पार पाडेल, अशी माहिती निवडणूक शाखेतील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com