पालखी तळांवरील कामे पूर्ण करा :प्रांताधिकारी ढोले

पालखी तळांवरील कामे पूर्ण करा :प्रांताधिकारी ढोले
पालखी तळांवरील कामे पूर्ण करा :प्रांताधिकारी ढोले

सोलापूर  : पंढरपूरची आषाढी वारी जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्‍यातील तीनही पालखी तळांची स्वच्छता व आवश्‍यक सोयी सुविधा वेळेपूर्वी ग्रामपंचायतींनी पूर्ण कराव्यात. भविकांना सुखकर वारीचा आंनद द्यावा, अशा सूचना प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.

आषाढी यात्रेसंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात नियोजन बैठक झाली. याप्रसंगी भंडीशेगाव, पिराची कुरोली आणि वाखरी येथील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि संबंधित अधिकारी उपसस्थित होते. 

ढोले म्हणाले, ‘‘पालखी सोहळ्यासमवेत येणाऱ्या भाविकांची व दिंड्यांची संख्या प्रतिवर्षी वाढत आहे. पालखी तळावर आवश्‍यक सोयी-सुविधा निर्माण करणे आवश्‍यक आहे. भाविक-भक्तांसाठी वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, सुरक्षा आदी व्यवस्था वेळेत उपलब्ध करावी. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी तळावरील काटेरी झुडपे काढणे, पालखी मार्गाची डागडुजी, साइट पट्ट्याची दुरुस्ती करावी, संबधित ग्रामपंचायतींनी पालखी तळांवर महिलांसाठी चेजिंग रूम उपलब्ध करून द्यावी. पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी येथील पालखी तळ भाविकांसाठी सज्ज होईल.’’

‘‘आषाढी यात्रेसाठी शहरातील ६५ एकर परिसराची स्वच्छता करावी, स्वच्छतागृह स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, भाविकांसाठी प्लॉटचे वाटप करावे, महावितरणे अखंडित वीजपुरवठा करावा. त्यासाठी आवश्‍यक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात विशेष डिपीची व्यवस्था करावी,’’ अशा सूचनाही ढोले यांनी या वेळी दिल्या. 

चंद्रभागेच्या वाळवंटातील घाटबांधणीचे काम १५ जूनपर्यंत भाविकांसाठी वापरण्या योग्य करून द्यावे, असेही ढोले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com