Agriculture news in marathi Complete the turn plan project: Bhujbal | Agrowon

वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळ

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

नाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून जात असते; हे जाणारे पाणी जनतेच्या उपयोगी आणण्यासाठी वळण योजना प्रकल्प तातडीने पूर्ण करा. राज्यातील पाणी गुजरातमध्ये वाहून न जाता ते राज्यात कसे राहील, याकडे लक्ष द्यावे; अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आढावा बैठक  सोमवारी (ता.२१) झाली. माजी खासदार समीर भुजबळ, येवला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नाशिक मुख्य अभियंता अलका अहिरराव, अरुण नाईक, राहुल पाटील, सागर शिंदे, राजेंद्र शिंपी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील जलसंपदा प्रकल्पांची सद्यस्थिती लक्षात घेऊन प्राधान्याने ते पूर्ण करा. जेणेकरून त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल. यामध्ये मांजरपाडा सहप्रवाही वळण योजनांसाठी प्राधान्य द्या. त्यानुसार उर्वरित इतर योजनांची मांडणी करावी.’’ 

तेलंगणास्थित कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील प्रकल्पांचा आराखडा सादर करावा. सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तात्काळ प्रकल्पाचे काम हाती घ्यावे. यासोबतच नदीजोड प्रकल्पासाठी 'मुख्य अभियंता' या स्वतंत्र पदाची निर्मिती विचाराधीन आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...