अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करा : पालकमंत्री डॉ. पाटील

जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करा : डॉ. पाटील
जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करा : डॉ. पाटील

अकोला : जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम सुफलाम अकोला’ अभियानातंर्गत भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने जिल्हयात विविध विभागार्फे जलसंधारणाची कामे सुरु आहेत. ती जलदगतीने पूर्ण करावीत, अशी सूचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केली.

‘अकोला सुजलाम सुफलाम’ प्रकल्पाच्या साप्ताहिक आढावा बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले,  उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके, प्रा.सुभाष गादीया, अकोला जिल्हा पेट्रोल डिलर संघटनेचे अध्यक्ष राहुल राठी आदी उपस्थित होते.

जिल्हयातील जलसंधारणाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने विनामुल्य जेसीबी, पोकलँड मशिन उपलब्ध करुन दिले आहेत. यासाठी डिझेलचा खर्च प्रशासन करीत आहे. विविध विभागामार्फत जिल्हयात चार हजार ९१ कामे केली जाणार आहेत. त्या माध्यमातून सुमारे १७५ लाख घनमीटर इतकी जलसंधारणाची कामे होतील. यामध्ये कपार्टमेंट बंडिंग, खोल सलग समतल चर, शेततळे, ई-क्लास शेततळे, मातीनाला/सिनाबा/गाळ काढणे, सिमेंट नाला खोलीकरण/सरळीकरण, नाला खोलीकरण, ढाळीचे बांध, वन तलाव दुरुस्ती, खोलीकरण, मातीकाम, वनतळे, पाणी खडडे, पाझर तलाव, नदया खोलीकरण, रुंदीकरण आदी कामे होतील. त्यासाठी  २३ कोटी ५० लाख रुपये डिझेलचा खर्च अपेक्षित आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com