अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई कामे त्वरित पूर्ण करा ः धोत्रे

अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई कामे त्वरित पूर्ण करा ः धोत्रे
अकोला जिल्ह्यातील पाणीटंचाई कामे त्वरित पूर्ण करा ः धोत्रे

अकोला ः जिल्ह्यातील पाणीटंचाई कार्यक्रमातंर्गत विविध कामांना प्रशासकीय मंजुरी मिळालेली असून पाणीटंचाई निवारणाची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास, दूरसंचार, इलेक्ट्राॅनिक्स माहिती तंत्रज्ञान खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिले. जिल्ह्यातील पाणीटंचाई व दुष्काळ सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने त्यांनी यंत्रणांकडून आढावा घेतला. या वेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिपंळे, आ. रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह इतर उपस्थितीत होते. श्री. धोत्रे पुढे म्हणाले, की योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी व लाभार्थी यांच्या समन्वयाने प्रलंबित असलेले प्रश्न तसेच समस्या निकाली निघण्यास वेळ लागत नाही. अधिकाऱ्यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांशी समन्वय साधून जनतेचे प्रश्न त्वरित निकाली काढावे. शेतकऱ्यांना धरणातून सिंचनासाठी पाणी देत असताना पाणी वापर संस्था यांच्या समन्वयाने नियोजन करावे. उगवा ते घुसर या गावांपर्यंत पाइपलाइन नवीन टाकण्यात आली आहे. परंतु उगवा ते चोहट्टा बाजार या गावांपर्यंत पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी लिकेजेस असल्यामुळे घुसर भागात पाणीपुरवठा व्यवस्थितरीत्या होत नसल्याची माहिती आ. सावरकर यांनी सांगितली. त्यावर सदर अतिरिक्त पाइपलाइनसाठी निधी प्राप्त करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. धोत्रे यांनी दिली. ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेतील पंप जुने असल्यामुळे व्यवस्थित पाणीपुरवठा होत नसल्याची बाब तसेच जांभळून पाणीपुरवठा योजना आदीबाबत आ. पिपंळे यांनी माहिती दिली. तेल्हारा व अकोट तालुक्यांतील १९१ खेडी पाणीपुरवठा योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. भारसाकळे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com