जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे पूर्ण

जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे पूर्ण
जळगावात दीड हजारांवर शेततळ्यांची कामे पूर्ण

जळगाव ः जिल्ह्यात "मागेल त्याला शेततळे'' योजनेंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकरी यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी सुमारे दीड हजार शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर इतर अनेक कामे प्रगती पथावर आहेत. 

शेततळे योजनेसंबंधी दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमधून अधिकची मागणी आली होती. या भागात कामे गतीने करण्यावर प्रशासनाने भर दिला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-२०१८ मध्ये निवडलेल्या २०६ गावांमध्ये विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या कामांमुळे २०५ गावे जलयुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. या अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये निवड करण्यात आलेल्या २०६ कामांमध्ये ४ हजार ९७ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी ४ हजार ७९ कामे पूर्ण झालेली आहेत. १३ कामे प्रगतिपथावर आहे. या कामांवर आतापर्यंत ५३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती प्रशासनाने जारी केली होती. आगामी काळात जी कामे २०१७-१८ या वर्षात मंजूर झाली, परंतु अपूर्ण राहीली, यासंदर्भात आढावा घेऊन संबंधित कामे पूर्ण करण्यावर प्रशासन भर देणार आहे. या महिन्यामध्ये या कामांबाबत कटाक्ष ठेवून कार्यवाही हाती घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या टप्प्यातील कामांनाही गती देण्यात आली आहे. यासंदर्भात कृषी व जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागावर मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com