Agriculture news in marathi Complete the work of Mahisal before 15th August | Agrowon

`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा`

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला, मंगळवेढा, जत या तिन्ही तालुक्‍यांतील ३२ हजार ५०० हेक्‍टर लाभक्षेत्राला पूर्ण क्षमतेने टेलपर्यंत पाणी मिळावे, यासाठी या योजनेची सर्व अपूर्ण कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी आहे.

सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला, मंगळवेढा, जत या तिन्ही तालुक्‍यांतील ३२ हजार ५०० हेक्‍टर लाभक्षेत्राला पूर्ण क्षमतेने टेलपर्यंत पाणी मिळावे, यासाठी या योजनेची सर्व अपूर्ण कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावीत, अशी मागणी आमदार शहाजी पाटील, आमदार भारत भालके, आमदार विक्रमसिंह सावंत व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली. 

म्हैसाळ योजना प्रकल्प अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी (ता. २) सांगोला येथे झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या वेळी म्हैसाळ योजना कार्यकारी अभियंता विजय पाटील, टेंभू योजना कार्यकारी अभियंता सचिन पवार, उपविभागीय अभिकारी सी. ए. मिरजकर, सहायक अभियंता मनोज कर्नाळे, अश्‍विन कर्नाळे, सुभाष देवकाते, दिलीप मोटे, संजय देशमुख, चंद्रकांत कारंडे आदी उपस्थित होते. 

आमदार पाटील म्हणाले, ‘‘म्हैसाळ योजनेचे पाणी प्रतापपूर तलाव व कुंभरी (जत) मार्गे कोरडा नदीत सोडून लहान मोठे तलाव व सर्व बंधारे भरून द्यावे. हे करत असताना मंगळवेढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी म्हैसाळ प्रकल्प सांगोला व मंगळवेढा वितरिका १ व २ वरील सर्व कामे पूर्ण करून घ्यावीत.’’ 

आमदार भालके म्हणाले की, ‘म्हैसाळ'चे पाणी कोरडा नदीमध्ये सोडत असताना अपुऱ्या कामांची तात्काळ पूर्तता करावी. आवर्तन सुरू झाल्यानंतर ‘टेल टू हेड' या नियमाप्रमाणे मंगळवेढा तालुक्‍याच्या लाभक्षेत्रातील टेलपर्यंत पाणीदेखील पोचेल, याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. 

पाण्याचा विसर्ग वाढवून या योजनेचे पाणी जत, सांगोला व मंगळवेढा या तिन्ही तालुक्‍यांना मिळण्यासाठी उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना आमदार सावंत यांनी केल्या. 

पहिल्यांदाच मिळणार पूर्ण क्षमतेने पाणी 

म्हैसाळ योजनेच्या मिळणाऱ्या आवर्तनातून मंगळवेढा, जत व सांगोला तालुक्‍यांतील ३२ हजार ५०० हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. म्हैसाळ प्रकल्पअंतर्गत मंगळवेढा वितरिका १ व २, सांगोला वितरिका क्रमांक एक व दोन व त्यावरील सर्व बंदिस्त नलिकांची कामे येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करून कोरडा नदीवरील मोठे तलाव, कोल्हापुरी बंधारे भरून देण्यासाठी जत, सांगोला व मंगळवेढा तालुक्‍याचे आमदार व अधिकारी यांचे एकमत झाले. त्यामुळे कोरडा नदीमध्ये या वर्षी पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने आवर्तन मिळणार आहे. 
 
 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...